करोना लस घेण्यास नकार; १४०० कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढले


न्यूयॉर्क:करोना महासाथीच्या आजारावर मात करण्यासाठी आणि आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणामुळे बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचेही चित्र दिसून आले आहे. अमेरिकेसह अनेक देशांतील नागरिकांमध्ये लसीबाबत अनेक शंका, भ्रम आहेत. त्यातूनच अनेकांनी लस घेण्यास नकार दिला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने लस न घेणाऱ्या १४०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्क राज्यातील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या ‘नॉर्थवेल हेल्थ’ कंपनीने ही कारवाई केली आहे. ‘नॉर्थवेल हेल्थ’ने आपल्या १४०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला होता. हेल्थकेअर कंपनीच्या प्रवक्ते जो केंप यांनी ही माहिती दिली.

WHO च्या तज्ज्ञांची आज बैठक; कोवॅक्सिनला मंजुरी मिळणार?
न्यूयॉर्कमधील ‘नॉर्थवेल हेल्थ’मध्ये (Northwell Health) जवळपास ७६ हजार कर्मचारी काम करत आहेत. यातील १४०० जणांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तर, उर्वरित कर्मचाऱ्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

अमेरिका: करोनाबळींची संख्या सात लाखांवर; मागील तीन महिन्यातील आकडेवारी धक्कादायक!
‘नॉर्थवेल हेल्थ’ कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे केले होते. कर्मचाऱ्यांनी कमी करणे नव्हे तर सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे असे आमचे उद्दिष्ट होते असे कंपनीने म्हटले. कामातून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी लस न घेण्याची घोषणा केली होती.

न्यूयॉर्कमध्ये सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लस घेणे आवश्यक केले आहे. मागील आठवड्यात याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. कॅलिफोर्नियासह इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

चिनी लशीचा दिलासा! डेल्टा वेरिएंटविरोधात ७९ टक्के प्रभावी असल्याचा दावा

सात कोटी लोकसंख्या लसीकरणाबाहेर

करोना लस घेतल्यानंतर संसर्ग झाल्यास गंभीर आजारापासून संरक्षण होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही अमेरिकेत लस घेण्यासाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या जवळपास सात कोटी जणांनी लस घेतली नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच डेल्टा वेरिएंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: