कोल्हापूरकरांनो सावधान! मुसळधार पावसामुळे तुमचं आरोग्य धोक्यात, काळजी घ्या


हायलाइट्स:

  • कोल्हापूरकरांनो सावधान!
  • मुसळधार पावसामुळे तुमचं आरोग्य धोक्यात
  • कोल्हापूरात जोरदार पाऊस पडल्याने जयंती नाला ओव्हर फ्लो

कोल्हापूर : सोमवारी वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह कोल्हापूरात जोरदार पाऊस पडल्याने जयंती नाला ओव्हर फ्लो झाला असून सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरातील मध्यभागातून जयंती नाला वाहतो. शहरातील ८० टक्के सांडपाणी जयंती नाल्यात येते. कसबा बावडा रोडवर जयंती नाल्यावर दगडी पूल असून सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून नाल्यावर महानगरपालिकेने बंधारा बांधला आहे. बंधाऱ्यात आडवलेले सांडपाणी कसबा बावडा येथील एसटीपीमध्ये नेण्यात येते.

कोल्हापुरात खळबळ! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह
तिथे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. पण काल सोमवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून जयंती नाला ओव्हर फ्लो झाला आहे. जयंती नाल्यावर दोन उपसा पंप असून त्याद्वारे पाणी उपसा करुन एसटीपी पाठवण्यात आहे. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जयंती नाल्यातून सांडपाणी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगंगा नदीत मिसळत आहे.

सांडपाणी मिसळल्याने पंचगंगेचे पाणी प्रदुषित होत असून नदीकाठच्या हातकणंगले, शिरोळ तालुक्यात पिण्यासाठी पंचगंगा नदीतून उपसा केला जातो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘झेडपी’ च्या १४ ते पंचायत समितीच्या २८ जागासांठी मतदान; तर उद्या होणार मतमोजणीSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: