

लखनऊः शांतता भंग केल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांच्यासह ११ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. यानंतर
प्रियांका गांधींना अटक करण्यात आली आहे. सीतापूर जिल्ह्यातील हरगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
प्रियांका गांधींना पहाटे ४.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे पुरुष पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना अजूनही कोर्टात हजर करण्यात आलेलं नाही. हा सर्व प्रकार बेकायदेशीर आणि लाज आणणारा आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदरम्बरम यांनी केला आहे. कुठल्याही महिलेला सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर अटक करण्यात येत नाही, असं चिदम्बरम म्हणाले.
प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आलं तिथे त्या सीतापूर येथील पीएसी गेस्ट हाऊसच्या बाहेर काँग्रेस समर्थकांनी आंदोलन केलं. लखीमपूर खिरीला जाण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना सोमवारी ताब्यात घेण्यात आले.
प्रियांका गांधी पोलीस कोठडीत
तत्पूर्वी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह ८ जणांच्या हत्येच्या घटनेवर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची अद्याप मंत्रिमंडळातून हकालपट्टी का केली नाही? मंत्र्याच्या मुलाला अटक का झाली नाही? असे प्रश्न प्रियांका गांधींनी उपस्थित केले आहेत.
Source link
Like this:
Like Loading...