मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का; फक्त विजय मिळवून फायदा नाही, तर…


दुबई: आयपीएलची पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची अवस्था १४व्या हंगामात अतिशय बिकट झाली आहे. या वर्षी विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी असलेला मुंबईचा संघ १० गुणांसह गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या अजून दोन लढती शिल्लक आहेत. या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तर त्यांना प्लेऑफमध्ये जाता येईल अशी चर्चा आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे.

वाचा-Video: ९ कोटी २५ लाखाच्या खेळाडूला साधा कॅच घेता आला नाही, विजय मिळवणाऱ्या सामन्यात झाला..

प्लेऑफसाठीच्या चौथ्या स्थानासाठी चार संघात मोठी चुरस आहे. कोलकाता नाईट रायडर्स १२ गुण आणि प्लस ०.२९४ रनरेटसह चौथ्या स्थानावर, पंजाब किंग्ज १० गुण आणि वजा ०.२४१ रनरेटसह पाचव्या, राजस्थान १० गुण आणि वजा ०.३३७ रनरेटसह सहाव्या तर मुंबई इंडियन्स १० गुण आणि वजा ०.४५३ रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. यातील पंजाबची एकच लढत शिल्लक असल्याने त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.

वाचा- गेल्या वेळेची धुलाई आठवते का? मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने राजस्थानला दिले ओपन चॅलेंज

सर्वाधिक शक्यता असलेला संघ म्हणजे केकेआर होय. पुढील लढतीत विजय मिळवल्यास ते १४ गुणांसह प्लेऑफमध्ये जातील. यात मुंबई इंडियन्स संघाला देखील प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना फक्त दोन सामन्यात विजय मिळून पुरेसे नाही. कारण मुंबईचे नेट रनरेट अतिशय खराब आहे. मुंबईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन मोठे विजय मिळवण्याची गरज आहे. तसे झाले तर केकेआरचा विजय झाला तरी मुंबई गुणतक्त्यात चौथे स्थान मिळवू शकतो. जर मुंबईने दोन्ही पैकी एक लढत गमावली तर त्यांना उर्वरीत एका लढतीत १०० पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागले.

वाचा- T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी झुंबड उडाली; एका तिकिटासाठी तब्बल…

फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मुंबई इंडियन्सने त्याच्या लैकिकाला साजेशीर कामगिरी केली तर ही अवघड कामगिरी ते करू शकतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: