विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी; घटस्थापनेपासून आरोग्य तपासणी करून दररोज १० हजार भाविकांना दर्शन


हायलाइट्स:

  • आता दररोज १० हजार भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन मिळणार आहे.
  • कोविड चाचणी गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच दर्शन मिळणार आहे.
  • घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मुखदर्शन भाविकांना मिळणार आहेत.

सूर्यकांत आसबे, सोलापूर

श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन आता दररोज १० हजार भाविकांना मिळणार आहे, कोविड गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच दर्शन मिळणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मुखदर्शन भाविकांना मिळणार आहेत. या संदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंगळवारी पंढरपूरमध्ये झाली. (since the establishment of ghat 10000 devotees will pay obeisance to lord vitthal every day)

विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. यामध्ये सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूरमधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. दर तासाला सातशे ते एक आठ हजार भाविकांना दर्शन दिले जाईल. यामधे ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. दहा वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शन मिळणार नाही.

क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! मुळा नदीच्या पुरात दोघे सख्ये भाऊ वाहून गेले

दर्शनास येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट सक्तीची असणार नाही. मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांचे आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच मंदिरांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट सक्तीची असणार आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टी प्रकरणात आणखी कोणाच्या अडचणी वाढणार?; आता मुंबई पोलिसही करणार चौकशी
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे चर्चाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: