bhupesh baghel : छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा लखनऊ विमानतळावर ठिय्या; ट्विट करून सांगितलं…


लखनऊः उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीतील हिंसाचारात ४ शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे यूपीतील भाजपचे योगी सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरला जाण्यापासून रोखत आहे. आता छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना यूपी पोलिसांनी लखनऊ विमानतळावर रोखलं आहे. भूपेश बघेल हे लखीमपूर खिरीला जाण्यासाठी निघाले होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना लखनऊ विमानतळावर आडवल्याने भूपेश बघेल यांनी विमानतळावरच ठिय्या दिला आहे. भूपेश बघेल यांनी तिथेच आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. कुठलाही आदेश नसताना आपल्याला लखनऊ विमानतळाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं. धरणे आंदोलन करणाऱ्या बघेल यांनी आपला फोटोही शेअर केला आहे.
लखीमपूर हिंसाचार; यूपीत प्रियांका गांधींना अटक, काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

कुठलाही आदेश नसताना आपल्याला लखनऊ विमानतळावर रोखलं आहे, असं धरणे आंदोलन करणाऱ्या बघेल यांनी सांगितलं. लखनऊला रवाना होण्यापूर्वी त्यांनी ट्विट केलं होतं. लखनऊसाठी निघालो आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारच, असं त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं.

लखनऊ विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा व्हिडिओही छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी शेअर केला आहे.

VIDEO: ‘हा व्हिडिओ पाहिलात का?’ म्हणत प्रियांकांकडून मोदींना लखीमपूरला येण्याचं आवाहनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: