मुंबई इंडियन्सने संघात केले दोन धक्कादायक बदल, पाहा कोणाला संधी मिळाली…
बोल्टने आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्ससाठी १८ विकेट्स घेतलेल्या आहेत. या १८ पैकी १५ विकेट्स जेव्हा बोल्टने घेतल्या आहेत तेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ विजयी ठरला आहे. त्याचबरोबरआतापर्यंत ९ सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये विकेट्स घेण्यात जेव्हा बोल्ट अपयशी ठरला आहे तेव्हा मुंबई इंडियन्सला फक्त तीनच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी बोल्ट हा लकी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे, खासकरून जेव्हा बोल्टने पॉवर प्लेमध्ये विकेट्स मिळवले आहेत तेव्हा मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ट्रेंट बोल्टने पॉवर प्लेमध्ये विकेट मिळवली तर मुंबई इंडियन्सच्या विजयाची आशी वाढणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी बोल्ट आणि जसप्रीत बुमरा हे सातत्याने अचूक मारा करत आहेत. पण बुमरापेक्षा जास्त यश बोल्टला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बोल्टची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर मुंबईचे फिरकी गोलंदाज आज कशी कामगिरी करतात, हेदेखील पाहावे लागेल. कारण आतापर्यंत कृणाल पंड्याा हवा तसा सूर गवसलेला दिसत नाही.