करोना: राज्यात आज २,४०१ नव्या रुग्णांचे निदान; एकूण सक्रिय रुग्णसंख्येत होतेय घटमुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. तसेच आजच्या मृत्यूसंख्येतही वाढ झालेली दिसत आहे. तर, कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ०२६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ८४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५ हजार ३८९ इतकी होती. तर, आज ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या २६ इतकी होती. (maharashtra registered 2401 new cases in a day with 2840 patients recovered and 39 deaths today)

आज राज्यात झालेल्या ३९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८८ हजार ८९९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी; घटस्थापनेपासून आरोग्य तपासणी करून दररोज १० हजार भाविकांना दर्शन

पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण होतयत कमी

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार १५९ इतकी आहे. काल ही संख्या ३३ हजार ६३७ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ५९३ इतका खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ७५० आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार २८० अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ८९८ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार १२१ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९४० आहे.

क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! मुळा नदीच्या पुरात दोघे सख्ये भाऊ वाहून गेले

मुंबईत उपचार घेत आहेत ६,१६१ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ६ हजार १६१ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ५९१ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६६९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७८८ इतकी खाली आली आहे.

नंदुरबार, गोंदियात १ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४९६, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०० इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०१ वर आली आहे. तर नंदुरबार आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १ सक्रिय रुग्ण आहे.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टी प्रकरणात आणखी कोणाच्या अडचणी वाढणार?; आता मुंबई पोलिसही करणार चौकशी

२,४०,०५२ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९४ लाख ६९ हजार ०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६४ हजार ९१५ (११.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४० हजार ०५२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ३३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: