lakhimpur kheri incident : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी CBI चौकशी व्हावी, सरन्यायाधीशांकडे मागणी


नवी दिल्लीः उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी ( lakhimpur kheri incident ) येथे रविवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे. आता या प्रकरणी योगी सरकार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरण हे आता सुप्रीम कोर्टात गेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्यात आलं आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी वकील शिवकुमार त्रिपाठी आणि सी. एस. पांडा यांनी सरन्यायाधीशी एन. व्ही. रमन्ना यांना पत्र लिहिलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी वकिलींनी केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू होती. आंदोलकांवर अशा प्रकारची कारवाई करणं हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे आणि हा लोकशाहीवर आघात आहे, असं वकिलींनी पत्रात म्हटलं आहे.

संपूर्ण घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करावी. केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपी पुत्रालाही शिक्षा व्हायला हवी. तसंच दोषी अधिकारी आणि घटनेत सामील असलेल्या मंत्री आणि नातेवाईकांविरोधातही कारवाई केली जावी, अशी मागणी पत्रातून केली गेली आहे. कोर्टाने कालबद्ध तपासाचे आदेश द्यावेत. तसंच सीबीआयसारख्या एजन्सीचाही या प्रकरणाच्या तपासामध्ये समावेश करावा आणि आपल्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करावी. याशिवाय केंद्रीय गृहमंत्रालयाला एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

लखीमपूर खिरीत इंटरनेट सेवा पूर्ववत

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरातील स्थिती मंगळवारी हळूहळू सामान्य होत असल्याचं दिसून आलं. जिल्हा मुख्यलयापासून ६० किलोमीटर अंतरावर तिकोनिया गावावरील रस्त्यांवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दलांचे जवान गस्त घालत आहेत. लखीमपूर रेल्वे स्टेशन, बाजार आणि इतर ठिकाणांवर सामान्य हालचाली दिसून आल्या.

sanjay raut met rahul gandhi : राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा, संजय राऊत का सांगत नाहीत?

जमावबंदी अजूनही कायम

लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी अजूनही कायम आहे. सुरक्षा दलांचे जवान महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहेत. पण गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आता जवानांची संख्या कमी झाली आहे. तिकोनिया गावाला जाणाऱ्या रस्त्यावर निघासन तहसीलमध्ये पुरेशा संख्येत पोलिस तैनात आहेत. याच तहसीलमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचे गाव आहे.

Lakhimpur Violence: माझ्या मुलाविरुद्ध पुरावा दाखवा, त्याक्षणी राजीनामा देईन : केंद्रीय मंत्री अजय मिश्रSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: