पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक Evm ची भुमिका संशयास्पद, स्वाभिमानी जाणार न्यायालयात

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक Evm ची भुमिका संशयास्पद, स्वाभिमानी न्यायालयात जाणार Pandharpur Mangalwedha Assembly by-election The role of Evm is doubtful

पंढरपूर, 04/05/2021 – पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतच्या निवडणुक प्रक्रीयेवर व EVM च्या विश्वासार्हर्तेबाबत संशय घेण्यास वाव निर्माण झाला आहे.कारण पोटनिवडणूकीत प्रत्यक्षात मतदान झालेली आकडेवारी व मत मोजणीची आकडेवारी यांमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे.

225485 ही मतदान झालेली आकडेवारी आहेत तर प्रत्यक्षात मतमोजणीत मात्र 224090 एवढीच मते दिसत आहेत.ही खरोखरच धक्कादायक बाब म्हणावी लागेल.आज आमच्यासह इतर अपक्ष उमेदवार सौ शैलाताई धनंजय गोडसे व सिध्देश्वर अवताडे यांना पडलेली मते देखील मनाला न पटणारी आहेत. याशिवाय आम्हाला कालपासून विविध ठिकाणांहून फोन येत आहेत की आम्ही आपल्याला मतदान केले आहे मात्र आमच्या बुथवर मात्र आपणास ‘शुन्य’ मते दर्शवित आहेत.

 शेवटी जय पराजय हा राजकारणात ठरलेलाच असतो परंतु आजकाल देशात लोकशाही किती जिवंत ठेवली आहे हे ही आपण जाणताच.म्हणुन आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना या पोटनिवडणुकीच्या संशयित प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.माझी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढलेल्या सर्व उमेदवारांना अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्वांनाच विनंती आहे की आपण ही या विषयावर आमच्या सोबत यावे अथवा स्वतंत्र्यपणे न्यायालयात जावे व सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न करावा.निवडणूक संपली,मतभेद संपले आहेत परंतु हा संशयास्पद विषय सर्वच उमेदवारांनी गांभीर्यपूर्वक मनावर घेणे गरजेचे आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: