षटकार मारून विजय मिळून देणारा आता बॅटिंग विसरला; ‘सुपर स्लो’ फलंदाजीवर चाहते भडकले


नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरूवात होण्याआधी चाहते चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची वाट पाहत होते. चाहत्यांना आशा होती की धोनी अशी काही तरी खेळी करेल जी सर्वांना लक्षात राहिल. पण स्पर्धेचा पहिला हंगाम आणि आता दुसऱ्या हंगामात असे काही पाहायला मिळाले नाही. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत धोनी १०व्या षटकात फलंदाजीला उतरला. धोनी इतक्या लवकर फलंदाजीला आल्यावर चाहत्यांना आशा होती की तो याचा फायदा घेईल आणि चाहते पुन्हा म्हणतील माही मार रहा है…

वाचा- मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का; फक्त विजय मिळवून फायदा नाही, तर…

दिल्ली विरुद्धच्या लढतीत धोनी सेट देखील झाला होती. चाहत्यांना वाटले आता त्यांना हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळेल. धोनी अखेरच्या षटकात काही मोठे शॉट खेळेल आणि चेन्नईला मजबूत धावसंख्या उभी करून देईल. कारण त्यानंतर रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो सारखे फलंदाज देखील होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. धोनीने १८ धावा काढण्यासाठी तब्बल २७ चेंडू घेतले. त्याला एकही चौकार मारता आला नाही. त्याचा स्ट्राईक रेट ६६.६७ इतका होता.

वाचा- Video: ९ कोटी २५ लाखाच्या खेळाडूला साधा कॅच घेता आला नाही, विजय मिळवणाऱ्या सामन्यात झाला

धोनीच्या धीम्या फलंदाजीवर चाहत्यांनी भरपूर टीका केली. काहींनी धोनीच्या अशा फलंदाजीचे खापर खेळपट्टीवर फोडले. चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने देखील धोनीचा बचाव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कोणत्याही फलंदाजाला धावा करणे सोपे नव्हते. सामना झाल्यानंतर ते म्हणाले, धोनी एकटा फलंदाज नव्हता. या खेळपट्टीवर धावा करणे सोपे नव्हते. मोठी धावसंख्या करण्यासाठी किंवा मोठे शॉट खेळण्यासाठी अवघड होते. यामुळेच १३७ धावसंख्या पुरेशी वाटत होती. तरी देखील आम्हाला १० – १५ धावा कमी पडल्याचे त्यांनी मान्य केले.

वाचा- T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी झुंबड उडाली; एका तिकिटासाठी तब्बल…

पाहा चाहते काय म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: