दसरा मेळावा यंदाही ऑनलाइन होणार?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान


हायलाइट्स:

  • शिवसेनेचा दसरा मेळाव्याची चर्चा
  • दसरा मेळावा ऑनलाइन होणार
  • संजय राऊतांनी केलं मोठं विधान

मुंबईः करोना महामारीच्या सावटाखाली मागील वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन झाला होता. मात्र, यंदा दसरा मेळाव्याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यंदा दसरा मेळावा प्रत्यक्षात होणार असल्याचे संकेत संजय राऊतांनी दिले आहेत.

मागील वर्षी शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून पहिलाच दसरा मेळावा होता. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन दसरा मेळावा घेण्यात आला होता. मात्र, यंदाही दसरा मेळावा ऑनलाइन होणार का याबाबत संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

वाचाः इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला ‘त्या’ व्याखेत बसत नाही: शिवसेना

‘दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाइन पद्धतीने होणार नाही हे निश्चित यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून दसरा मेळावा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लवकरच निर्णय घेतील,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः आर्यन खान, अरबाझची रात्रभर एकत्र चौकशी; ही माहिती समोर

केंद्र सरकार कडून अद्याप संवेदना का व्यक्त केल्या नाहीत?

लखीमपूर मध्ये जो प्रकार घडला, त्यामुळं सगळ्यांना चिंता आहे. केंद्र सरकार कडून अद्याप संवेदना का व्यक्त केल्या नाहीत? आजही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि विरोधकांना दोष दिला जातोय. संतापला वाट मोकळी करून देणे विरोधी पक्षाचे काम आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मंगळवारी भेटलो, ते आज लखनौला जाणार आहेत, त्यांनाही अडवले जाणार असल्याचं समजतेय, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः भावना गवळींच्या निकटवर्तीय सईद खानला न्यायालयीन कोठडीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: