Lakhimpur Violence: आम्हाला मारा नाहीतर गाडा, लखीमपूरला जाणारच : राहुल गांधी


हायलाइट्स:

  • दोन मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधी लखीमपूरच्या दौऱ्यावर
  • ‘कलम १४४ पाच जणांना रोखू शकतं. आम्ही केवळ तीन जण तिथे जात आहोत’
  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी सोबत

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचारानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं तीन सदस्यीय प्रतिनिधीमंडळ आज घटनास्थळाचा दौरा करणार आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी दिल्लीच्या काँग्रेस पक्षकार्यालयात उपस्थित होते. बघेल आणि चन्नी हे दोन मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्यासोबत लखीमपूर दौऱ्यावरही जाणार आहेत.

‘कलम १४४ तीन जणांना रोखू शकत नाही’

लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. परंतु, कलम १४४ पाच जणांना रोखू शकतं. आम्ही केवळ तीन जण तिथे जात आहोत. विरोधकांचं काम सरकारवर दबाव तयार करण्याचं असतं. परंतु, विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरू नयेत आणि दबाव टाकू नये, हेच सरकारचं धोरण आहे. आम्ही हाथरसला गेलो नसतो तर ज्या बलात्कार प्रकरणातील सगळे आरोपी मोकाट सुटले असते. लखीमपूरलाही आम्ही आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरकार दबाव तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, घटनास्थळी जाऊन परिस्थितीचं आकलन करण्यासाठी आम्ही लखनऊला जात आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Priyanka Gandhi: ‘अटकच बेकायदेशीर, बेल बॉन्ड का भरावा?’, प्रियांका गांधींचा प्रश्न
Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसा केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाचा सुनियोजित कट, FIR मध्ये उल्लेख
यावेळी, पत्रकारांनी राहुल गांधींना प्रियांका गांधी यांच्या अटकेसंबंधी प्रश्न विचारला. तेव्हा, प्रियांकांना मारहाण किंवा जबरदस्तीनं कोणताही फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यासोबत काहीही केलं तरी त्यानं आता फरक पडणार नाही. आम्हाला मारा, गाडा, आमच्यासोबत चुकीचं वर्तन करा… आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही याची ट्रेनिंग घेतलीय. कित्येक वर्षांपासून ही ट्रेनिंग आमच्या कुटुंबातूनच आम्हाला सुरू आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, आम्ही तो उचलत राहणार, असंही राहुल गांधींनी म्हटलंय.

‘पंतप्रधान मोदी लखीमपूरला गेले नाहीत’

गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्तानातील सरकार शेतकऱ्यांविरोधात आक्रमक होत आहे. शेतकऱ्यांना जाणूनबुजून जीपखाली चिरडलं जातं. त्यांची हत्या केली जाते. भाजपच्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं नाव समोर येतं, त्यांच्या मुलाचं नाव समोर येतं… परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अगोदर भूमीग्रहण… मग तीन नवीन कृषी कायदे… शेतकऱ्यांकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. ही सगळी चोरी उघडपणे केली जातेय. त्यामुळेच गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी राजधाीच्या बाहेर बसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल लखनऊमध्ये होते, मात्र ते लखीमपूर खीरीला जाऊ शकले नाहीत. मृत शेतकऱ्यांचं शवविच्छेदनही योग्य पद्धतीनं करण्यात आलं नाही. जे आरोप करण्यात आले त्यांना झिडकारण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.

rahul gandhi : राहुल गांधींना लखीमपूर खिरीला जाण्यास यूपी सरकारने परवानगी नाकारली
lakhimpur kheri incident : लखीमपूरप्रकरणी आरोपी मंत्री पुत्राला अटक करण्यात दिरंगाई का? पोलिसांनी सांगितलं कारण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: