तैवाननंतर चीनला या लहान देशाने दिला इशारा; राजदूताला बोलावणे धाडले


क्वालालंपूर : मागील काही महिन्यांपासून चीन सतत अनेक मुद्यांवर वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे भारतासह इतर शेजारी देशांसोबत चीनचे तणावपूर्ण संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनने राष्ट्रीय दिवस साजरा करताना तैवानच्या हवाई हद्दीत आपले लढाऊ विमानांद्वारे घुसखोरी केली होती. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, जपानसोबतही चीनचा वाद आहे. तैवानने चीनला इशारा दिल्यानंतर आता आणखी एका देशाने चीनला इशारा दिला आहे. दक्षिण चीन समुद्राच्या मुद्यावरून मलेशियाने चीनच्या राजदूतालाच बोलावणे धाडले.

दक्षिण चीन समुद्रात चीन आपली सागरी सीमा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्या फटका इतर देशांनाही बसणार आहे. मलेशियाने दक्षिण चीन समुद्रात क्वालालंपूरच्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी जहाजांची उपस्थिती आणि हालचालींमध्ये वाढ झाली आहे. मलेशियाने यावर आक्षेप घेतला आहे. मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चिनी जहाजांसोबत एक सर्वेक्षण जहाजदेखील होते. हे जहाज मलेशियन राज्य सबा आणि सरवाकच्या किनाऱ्यांवर काम करत होते.

आमच्या देशावर हल्ला केल्यास आशियाचा विनाश होईल; चीनला ‘या’ देशाचा इशारा
चीनची ही कृती संयुक्त राष्ट्राच्या १९८२ च्या सागरी कायद्याचे उल्लंघन असल्याचे मलेशियाने म्हटले आहे. मलेशियाने केलेली भूमिका आणि केलेली कारवाई ही आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून असल्याचे ही मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. मलेशिया आपल्या सागरी हद्दीच्या संरक्षणासाठी, सार्वभौमत्वासाठी, संरक्षणासाठी पावले उचलणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, नेमके किती जहाज होते, कोणत्या दिवशी ही घटना घडली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

श्रीलंकेतील बंदराचे कंत्राट अदानींना; भारताचा चीनला शह, अशी केली कुरघोडी
दक्षिण चीन समुद्र हा सागरी व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याशिवाय या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याचे म्हटले जाते. चीनकडून जवळपास सर्वच दक्षिण चीन समुद्राच्या भागावर सातत्याने दावा सांगणयात येतो. चीनच्या या दाव्याला मलेशिया, फिलीपाइन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम आदी देशांनी सातत्याने विरोध केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: