‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ म्हणत केला भयंकर प्रकार, विवाहित महिलेचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ पाठवला पतीला
हायलाइट्स:
- ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ म्हणत केला भयंकर प्रकार
- विवाहित महिलेचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ पाठवला पतीला
- चाकू आणि विषारी बाटलीचा धाक दाखवून केले महिलेचे लैंगिक शोषण
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील रहिवासी सचिन पोटींदे (२८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तू आवडतेस असे म्हणत सचिन हा पीडित २९ वर्षीय महिलेला मोबाइलवर वारंवार कॉल करीत होता. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करीत होता. त्याला महिलेने नकार दिला. त्यावर सचिनने त्यांना टॉयलेट क्लिनर पिल्याचा व्हिडिओ पाठवला. या प्रकाराने पीडित महिला घाबरली. त्यानंतर पुन्हा सचिनने महिलेकडे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती केली. यावेळीही महिलेने नकार दिला. त्यावर सचिनने चाकू आणि विषारी द्रव्याच्या बाटलीचा धाक दाखवून पीडित महिलेचे लैंगिक शोषण केले.
या प्रकाराचा त्याने मोबाइलद्वारे व्हिडिओ बनवला. त्यानंतर सदर प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी त्याने महिलेच्या पती व मुलींना मारून टाकण्याची धमकी दिली. शिवाय, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली. या माध्यमातून तो महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती करू लागला.
दरम्यान, या आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने पीडितेचे पती, दिर व अन्य काही लोकांना पाठवून त्यांची समाज व नातेवाइकांमध्ये बदनामी केली. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सचिन पोटींदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.