Priyanka Gandhi: प्रियांकांच्या अटकेनं कुटुंब धास्तावलंय, पती रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली चिंता


हायलाइट्स:

  • ‘प्रियांका यांचं इंटरनेटही बंद करण्यात आलं’
  • इतर नेत्यांना सोडलं, मग प्रियांका कैदेत का?
  • ‘एका महिलेला तुम्ही एवढं का घाबरता की त्यांना रोखून ठेवण्यात आलंय’
  • कोणत्या आधारावर प्रियांकांना अटक करण्यात आली?

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचारानंतर पीडितांच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी चिंता व्यक्त केलीय. तसंच प्रियांका यांना कैदेत ठेवण्यावरून रॉबर्ट वाड्रा यांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

कोणत्या आधारावर प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आलीय? आपलं संपूर्ण कुटुंब धास्तावलंय. मुलं चिंतेत आहेत, असं यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशात महिलांसोबत गैरवर्तवणूक करण्यात येते. ताब्यात घेण्यात आलेल्या इतर नेत्यांना सोडून देण्यात आलंय परंतु, प्रियांका यांना अजूनही कैदेत का ठेवण्यात आलंय? असा प्रश्नही वाड्रा यांनी उपस्थित केलाय.

Rahul Gandhi: ‘पत्रकार ज्या पद्धतीनं विरोधकांना प्रश्न विचारतात ते लोकशाहीत नाही हुकूमशाहीत विचारले जातात’
Lakhimpur Violence: आम्हाला मारा नाहीतर गाडा, लखीमपूरला जाणारच : राहुल गांधी
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कारवाईवरही त्यांनी टीका केलीय. ‘कोणत्या आधारावर प्रियांका यांना कैदेत ठेवण्यात आलंय. एका महिलेला तुम्ही एवढं का घाबरता की त्यांना रोखून ठेवण्यात आलंय. प्रियांका केवळ आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत तिथे गेल्या होत्या. त्यांना पीडितांना भेटू दिलं गेलं असतं तर पुढचा प्रसंग टळला असता’, असंही त्यांनी म्हटलंय.

मी प्रियांका यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की इंटरनेटही बंद करण्यात आलंय. त्यांनी काही संपर्क क्रमांक दिले आहेत, ज्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकेल. मी त्यांचा पती आहे. माझं सगळं कुटुंब यामुळे घाबरलेल्या अवस्थेत आहे. मुलंही चिंतेत आहेत, असं म्हणत रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पत्नीबद्दल चिंता व्यक्त केलीय.

यापूर्वी, प्रियांका गांधी यांनी आपल्याला बेकायदेशीपणे अटक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ‘मला अटक करणारे अधिकारी डीसीपी पीयूष कुमार सिंह, सीओ शहर, सीतापूर यांच्याद्वारे मला तोंडी स्वरुपात सूचित करण्यात आलं. मला ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ४.३० वाजता कलम १५१ अंतर्गत अटक करण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं. ज्या वेळी मला अटक करण्यात आली, त्यावेळी मी लखीमपूर खीरीच्या सीमेपासून जवळपास २० किलोमीटर दूर सीतापूर जिल्ह्यात होते. माझ्या माहितीप्रमाणे, सीतापूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेलं नव्हतं. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मला माझ्या वकिलांनाही भेटण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही’, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

Priyanka Gandhi: ‘अटकच बेकायदेशीर, बेल बॉन्ड का भरावा?’, प्रियांका गांधींचा प्रश्न
sanjay raut met rahul gandhi : राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा, संजय राऊत का सांगत नाहीत?Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: