IND vs NZ ODI – वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियाची इज्जत गेली, खराब परफॉर्मन्समुळे मालिका गमावली


क्राईस्टचर्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज पूर्णविराम लागला आहे. या तीन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने भारतावर विजय मिळवला तर दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. अशारीतीने यजमान न्यूझीलंड संघाने भारताविरुद्धची ही तीन सामन्यांची मालिका ०-१ अशा फरकाने जिंकली आहे. पावसाच्या अनपेक्षित हजेरीमुळे आणि भारतीय खेळाडूंनी अपेक्षित अशी कामगिरी न केल्यामुळे भारताने ही मालिका गमावली.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी केली. सुरुवातीला पाऊस असल्यामुळे सामन्याची नाणेफेक होण्यासाठी थोडा उशीर झाला. त्यानंतर भारताचा पहिला डाव पाऊस न होता सुरळीत पार पडला. ज्यामध्ये भारताने २२० धावांचे लक्ष्य किवी संघाला दिले. परंतु सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करून ठेवल्याने भारताचे सर्वच फलंदाज पटापट तंबूत परतले. केवळ श्रेयस अय्यर (४९ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (५१ धावा) भारतासाठी खेळी साकारता आली.

वाचा: सूर्या, धवन, पंत सगळेच ठरले फेल…शेवटी टीम इंडियासाठी धावून आला गोलंदाज!

न्यूझीलंडचा डाव सुरू झाल्यानंतर १८ षटके होताच पावसामुळे मध्येच थांबवण्यात आला. यामध्ये १८ षटकांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने १०४ धावा केल्या. पावसामुळे मॅच थांबण्यापूर्वी डेवॉन कॉन्व्हेने ३८ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडचा कर्णधार कॅन विल्यमसन नुकताच मैदानात आला होता. न्यूझीलंड चा सलामी वीर फिन अॅलेन याने ७५ धावा केल्या होत्या आणि त्याला उमरान मलिकेने झेलबाद केले.

हेही वाचा: माझा रेकॉर्ड खराब नाही… हर्षा भोगलेंच्या त्या प्रश्नावर LIVE सामन्यातच ऋषभ पंत भडकला

डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाच्या धावांपेक्षा ५० धावा पुढे होता. पण या सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू होण्यासाठी कमीत कमी २० षटके पूर्ण होणे आवश्यक होते. पण केवळ १८ षटके पूर्ण झाली असल्याने डकवर्थ लुईस नियम लागू झाला नाही आणि हा सामना रद्द करण्यात आला.

वाचा: IND vs NZ तिसरी वनडे: पावसामुळे मॅच थांबली, DLS लागू झाल्यास भारत सामना

वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी (५१) खेळी आणि फलंदाज श्रेयस अय्यरच्या ४९ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७.३ षटकांत दहा गडी गमावून २१९ धावा केल्या. त्याचवेळी भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २२० धावांचे आव्हान दिले. किवी संघाकडून अ‍ॅडम मिलने आणि डॅरिल मिशेल या गोलंदाजांनी ३-३ बळी घेतले. भारताच्या फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही युनिटने आपली अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: