FIFA World Cup: फुटबॉलचा सर्वात महागडा संघ तुम्हाला माहितेय का? अर्जेंटिना, पोर्तुगालही फिके


दोहा: क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक फिफा फुटबॉल विश्वचषक सध्या कतार येथे खेळला जात आहे आणि दिवसेंदिवस खेळात थरार आणखी वाढत आहे. स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी ३६ संघ एकमेकांना काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. दिग्गज खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला लागली असताना तरुण खेळाडूंनाही आपली ओळख निर्माण करण्यासाठी संधी आहे. जगभरातील संघांच्या प्रसिद्धीचे मुख्य कारण हे त्यांचे स्टार खेळाडूच आहे. पण जेव्हा वेगवेगळ्या संघांच्या सर्व खेळाडूंचे बाजारमूल्य जोडले गेले तेव्हा पोर्तुगाल, अर्जेंटिना आणि ब्राझीलला मागे टाकून इंग्लंड सर्वात महागडा संघ ठरला.

फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर…
‘थ्री लायन्स’ म्हणून प्रसिद्ध इंग्लंडचा संघ गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि यावेळी देखील संघ विजेतेपदाचा दावेदार म्हणून उतरला आहे. ट्रान्सफरमार्केट वेबसाइटच्या डेटानुसार हॅरी केनच्या टीमचे बाजार मूल्य १.२६ अब्ज युरो आहे, जो ग्रेनाडासारख्या छोट्या देशांच्या जीडीपीएवढा आहे. कतारमध्ये खेळली जाणारी स्पर्धा आत्तापर्यंतची सर्वात महागडी असल्याचा दावा केला जात आहे.

टॉप-१० मध्ये तीन लॅटिन अमेरिकन संघ
याशिवाय कतार विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांपैकी तीन लॅटिन अमेरिकन देशांचे संघ बाजार मूल्याच्या यादीत टॉप-१० मध्ये आहेत. यामध्ये ब्राझील संघ १.१ अब्ज युरोच्या बाजारमूल्यासह अग्रणी आहे. तर अर्जेंटिनाचा संघ एकूण सातव्या तर लॅटिन संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय ४५० दशलक्ष युरोच्या बाजारमूल्यासह उरुग्वेचा संघ सर्वात महागड्या संघांच्या यादीत एकूण दहाव्या आणि लॅटिन देशांच्या गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जगाची लोकसंख्या ८ अब्ज आणि वर्ल्ड कप फुटबॉलच्या प्रेक्षकांची संख्या…
कतार संघ स्पर्धेबाहेर
फिफा विश्वचषक २०२२ च्या आपल्या तिसऱ्या सामन्यातही यजमान कतारला पराभव पत्करावा लागला आहे. नेदरलँड्सने त्याचा २-० असा पराभव करत यजमान संघाला घरचा रस्ता दाखवला. संघाचा स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. यासह कतार संघ स्पर्धेबाहेर पडला असून नेदरलँड्सशिवाय सेनेगल अ गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे.

फिफा विश्वचषकात यजमान कतारने हे काय केले, नावावर झाला लाजीरवाणा विक्रम
सर्वाधिक बाजार मूल्य असलेले संघ

  • इंग्लंड – १,२६० दशलक्ष युरो
  • ब्राझील – १,१४० दशलक्ष युरो
  • फ्रान्स – १,००० दशलक्ष युरो
  • पोर्तुगाल – ९३७ दशलक्ष युरो
  • स्पेन – ९०२ दशलक्ष युरो
  • जर्मनी – ८८६ दशलक्ष युरो
  • अर्जेंटिना – ६३३ दशलक्ष युरो
  • नेदरलँड – ५८७ दशलक्ष युरो
  • बेल्जियम – ५६३ दशलक्ष युरो
  • उरुग्वे – ४५० दशलक्ष युरोSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: