स्टार्टअपचा नवा फंडा; आठवड्यातून फक्त ३ दिवस करा काम अन् मिळेल पूर्ण पगार
हायलाइट्स:
- बेंगळुरूच्या एका स्टार्टअपने या दिशेने एक नवा फंडा समोर आणला आहे.
- या स्टार्टअपने आठवड्यातून फक्त तीन दिवस काम करण्याचं नवीन मॉडेल कर्मचाऱ्यांसाठी आणलं आहे.
- कामगार आठवड्यातून तीन दिवस काम करून वेतन आणि पूर्ण लाभ मिळवू शकतात
गृहिणींचं बजेट कोलमडणार; घरगुती गॅस सिलिंडर महागला, मुंबईत एका सिलिंडरसाठी मोजा इतके रुपये
अशी सुविधा देणाऱ्या स्टार्टअपचं नाव आहे स्लाइस. ही फिनटेक कंपनी आहे. स्लाईस नवीन कर्मचार्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस काम करण्याची ऑफर देत आहे, पण त्यांचे वेतन हे चालू बाजारभावाच्या ८० टक्के असेल, अशी अट त्यांनी घातली आहे. १९२६ मध्ये, हेन्री फोर्ड यांनी सहा दिवसांच्या ऐवजी पाच दिवसांच्या कामाचा आठवडा स्वीकारला. तरीही उत्पादनक्षमतेवर काही परिणाम झाला नाही. या प्रयोगानंतर अनेक कंपन्यांनी आणि देशांनी पुन्हा चार दिवसांच्या कामाचा आठवड्याचे वर्षानुवर्षे पालन केले आहे.
इंधन महागले; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी दिला ग्राहकांना शॉक
कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर
कंपनीचे संस्थापक राजन बजाज म्हणाले की, हा एक चांगला दृष्टिकोन आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना इतर गोष्टी किंवा आवडींचा पाठपुरावा करण्यासाठी वेळ मिळतो. हे कामाचे भविष्य आहे. लोक नोकऱ्यांमध्ये अडकून राहू इच्छित नाहीत. कामगार आठवड्यातून तीन दिवस काम करून वेतन आणि पूर्ण लाभ मिळवू शकतात, आणि त्यांचा उर्वरित वेळ स्टार्टअपच्या स्वप्नासाठी, सह-संस्थापक शोधण्यासाठी किंवा कामाशिवाय आपली आवड शोधण्यात घालवू शकतात.”
‘यूके’मध्ये दिवाळखोर अन् हजारो कोटी दडवले; ‘पॅंडोरा पेपर्स’मुळे अनिल अंबानींचा खरा चेहरा उघड
आयटी आउटसोर्सर्स, सिलिकॉन व्हॅली जायंट्स, ग्लोबल रिटेलर्स आणि वॉल स्ट्रीट बँकांच्या तंत्रज्ञान केंद्रांमध्ये शेकडो स्टार्टअप्स तेजीत आहेत. यामुळे प्रतिभेची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
सध्या कंपनीमध्ये ४५० कर्मचारी
सध्या स्लाइसमध्ये ४५० कर्मचारी आहेत आणि पुढील तीन वर्षांत एक हजार अभियंते आणि उत्पादन व्यवस्थापकांची भरती करण्याचा विचार करीत आहेत. २०१६ मध्ये स्थापित, स्लाईस भारतातील तरुणांना क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात माहिर आहे. २०१९ मध्ये, कंपनीने आपले भौतिक कार्ड एका मिनिटापेक्षा कमी साइन-अप, कॅशबॅक आणि एकाधिक पेमेंट पर्यायांसह लॉन्च केले. स्लाइसने गेल्या महिन्यात १,१०,००० कार्ड जारी केले, ज्यामुळे ते देशातील प्रमुख कार्ड प्रदात्यांपैकी (प्रोव्हायडर्स) एक बनले.