इंधन महागले; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी दिला ग्राहकांना शॉक


हायलाइट्स:

  • जागतिक बाजारातील महागाईने कच्च्या तेलाची आयात खर्चिक बनली आहे.
  • आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.
  • बाजारात कच्च्या तेलाचा भाव ८२ डॉलरवर गेला आहे.

मुंबई : जागतिक बाजारातील महागाईने कच्च्या तेलाची आयात खर्चिक बनली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ८२ डॉलरवर गेला आहे.

‘यूके’मध्ये दिवाळखोर अन् हजारो कोटी दडवले; ‘पॅंडोरा पेपर्स’मुळे अनिल अंबानींचा खरा चेहरा उघड
आठ दिवसांत झालेल्या दरवाढीने नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ केली होती. सोमवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर मंगळवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली. मागील आठ दिवसात डिझेल २.८० रुपयांनी तर पेट्रोल १.७५ रुपयांनी महागले आहे.

पॅंडोरा पेपर्स प्रकरण ; केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल, अर्थ मंत्रालयाने घेतला ‘हा’ निर्णय,
सलग दोन दिवस झालेल्या दरवाढीने आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९६ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०२.९४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १००.४९ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०३.६५ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १११.४५ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०६.५२ रुपये झाले आहे.

तेजी मंदीचा खेळ; कमॉडीटी बाजारात सोने-चांदीमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९९.१७ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९१.४२ रुपये आहे. चेन्नईत ९५.९३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९४.५३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १००.४२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९७.०३ रुपये आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत आहे. अमेरिकेत ब्रेंट क्रूडचा भाव १.३० डाॅलरने वाढून ८२.५६ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.११ डाॅलरने वधारला आणि तो ७८.७३ डाॅलर प्रती बॅरल झाला. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे. युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: