अमेरिकेजवळ ‘इतका’ आहे अण्वस्त्र साठा; परराष्ट्र विभागाने प्रसिद्ध केली संख्या


वॉशिंग्टन: अमेरिकेने मागील चार वर्षात पहिल्यांदाच देशातील अणूबॉम्बची संख्या जाहीर केली आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही आकेडवारी जाहीर करण्यास बंदी घातली होती. ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर आता बायडन प्रशासनाने अण्वस्त्रांची संख्या जाहीर केली आहे.

अमेरिेकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अमेरिकन सैन्याकडे ३७५० सक्रिय आणि निष्क्रिय अण्वस्त्र होती. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ३८०५ होती. तर, सन २०१८ मध्ये ३७८५ अण्वस्त्रे होती.

अमेरिकेकडून ‘या’ क्षेपणास्त्राची चाचणी; रशिया-चीनला भरणार धडकी!

तैवाननंतर चीनला या लहान देशाने दिला इशारा; राजदूताला बोलावणे धाडले
माहितीनुसार, सन १९६७ मध्ये रशियासोबतच्या शीत युद्धानंतर हा आकडा सगळ्यात कमी आहे. शीत युद्धाच्या या कालावधीत अमेरिकेजवळ एकूण ३१ हजार २५५ अण्वस्त्र होते.

भारताच्या ताफ्यात लवकरच रशियन एस-४००; अमेरिका निर्बंध लादणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाद्वारे ट्रम्प प्रशासनाने अण्वस्त्रांच्या माहितीवर लावण्यात आलेला ‘ब्लॅकआउट’ हटवून रशियासोबत पुन्हा एकदा अण्वस्त्र नियंत्रण चर्चेला पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी आणि नि:शस्त्रीकरणाच्या प्रयत्नांसाठी अण्वस्त्र साठ्यांच्या माहितीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: