lakhimpur kheri : ‘लखीमपूर हिंसाचारातील मारेकऱ्यांना केंद्र सरकार वाचवतेय’


नवी दिल्लीः लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अखेर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि नेते राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार मारेकऱ्यांना वाचवण्याच्या कामात लागली आहे, असा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला.

लखीमपूर खिरीत संपूर्ण यंत्रणाच चिरडली गेली आहे. शेतकऱ्यांनी सरकारचं काय वाईट केलं आहे? असा सवाल करत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर एकामागून एक अनेक हल्ले केले. लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या घटनेवर अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

लखीमपूर घटनेची देशभरात चर्चा

लखीमपूरमध्ये जे काही घडले, त्यावर देशभरात चर्चा सुरू आहे. मारेकऱ्यांना अजून अटक का केली नाही? मारेकऱ्यांना का वाचवले जात आहेत? केंद्र सरकार मारेकऱ्यांना वाचवण्यात व्यग्र आहे. लखीमपूरमध्ये जे घडले ते ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारे आहे. शेतकऱ्यांनी सरकारचे काय बिघडवले? आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसा केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाचा सुनियोजित कट, FIR मध्ये उल्लेख

मुख्यमंत्री केजरीवालांचा प्रश्न

मारेकऱ्यांना अद्याप अटक का केली नाही? काय कारण आहे? त्यांना का वाचवले जात आहे? एवढ्या गर्दीच अनेकांना चिरडून कोणीतरी निघून जातंय आणि संपूर्ण यंत्रणा त्या मारेकऱ्याला वाचवण्यात गुंतली आहे. हे आपण आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये बघितलं आहे, असं ते म्हणाले.

Lakhimpur Violence: प्रियांका, राहुल गांधींसहीत तीन नेत्यांना लखीमपूर जाण्याची परवानगी

एकीकडे सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते मृतांच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना त्यांना तुरुंगात टाकले जात आहे, हा कुठला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे ही सर्वांची मागणी आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: