मराठा समाजाचे सरकारविरुद्ध अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन

मराठा समाजाचे सरकारविरुद्ध अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन Half-naked bombing movement of Maratha community against government
मराठा समाजाचे सरकारविरुद्ध अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन

पंढरपूर ,नागेश आदापूरे, ०५/०५/२०२१- मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार विरुद्ध पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये मराठा समाजाच्यावतीने सरकार विरुद्ध अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मराठा समाजास आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं आज मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षण कायदा रद्द केलं आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही बांधवांनी अर्धनग्न होऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करीत सामुहिक मुंडण आंदोलन केल.राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे.

सरकार आरक्षणाच्यावतीने बाजू कमी पडल्याचा आरोप पंढरपुरातील समाज बांधवांनी केला आहे. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही मंत्री, आमदार, खासदार यांच्या गाड्या फोडू असा इशारा दिला,आमच्या ५६ मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले,अनेक युवक तुरुंगात आहेत आणि सरकार गप्प आहे,हा आमच्यावर मोठा अन्याय असून याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, स्वागत कदम, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत शिरगिरे, धनंजय मोरे, शिवसुराज्य संघटनेचे अध्यक्ष संदीप मुटकुळे, संतोष कवडे आदीसह मराठा समाज बांधव उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: