केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांपासून ट्रान्सजेंडर्सना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ


हायलाइट्स:

  • आयुष्मान भारत योजनेत (ABY) मोठा बदल करण्यात आला आहे.
  • हेल्थ बेनिफिट पॅकेजमध्ये अनेक हेल्थ पॅकेजचे दर २० टक्क्यांवरून ४०० टक्के पर्यंत वाढविण्यात आले.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) नुकताच हा बदल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेत (ABY) मोठा बदल करण्यात आला आहे. हेल्थ बेनिफिट (आरोग्य लाभ) पॅकेजमध्ये अनेक हेल्थ पॅकेजचे दर २० टक्क्यांवरून ४०० टक्के पर्यंत वाढविण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) नुकताच हा बदल करण्यात आला आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PMJAY) देशभरात लागू करणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (National Health Authority) ही माहिती दिली आहे.

स्टार्टअपचा नवा फंडा; आठवड्यातून फक्त ३ दिवस करा काम अन् मिळेल पूर्ण पगार
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील १० कोटी गरीब कुटुंबांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट ४०० आरोग्य पॅकेजच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये काळ्या बुरशीसारख्या (ब्लॅक फंगस) आजारांसाठी नवीन वैद्यकीय व्यवस्थापन पॅकेज देखील जोडले गेले आहे.

गृहिणींचं बजेट कोलमडणार; घरगुती गॅस सिलिंडर महागला, मुंबईत एका सिलिंडरसाठी मोजा इतके रुपये
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया याबद्दल म्हणाले की, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आरोग्य लाभ पॅकेजची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे आयुष्मान भारत योजनेशी संबंधित रुग्णालये एबी-पीएमजेच्या लाभार्थ्यांना चांगले उपचार मिळू शकतील. ऑन्कोलॉजीसाठी सुधारित पॅकेजमुळे देशभरातील कर्करोगाच्या अनेक रुग्णांना यामुळे लवकर मदत मिळण्याची अपेक्षा आहे. काळ्या बुरशीसारख्या नवीन रोगावरील उपचाराचा यामध्ये समावेश केल्यामुळे, देशातील लोकांना याचा खूप फायदा होऊ शकतो. हेल्थ बेनिफिट पॅकेजमध्ये केलेल्या बदलांमुळे खाजगी रुग्णालयांत गरीब लोकांना उपचार घेण्याची संधी मिळेल आणि खिशातून कोणताही अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार नाही, असेही मांडवीया म्हणाले.

इंधन महागले; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी दिला ग्राहकांना शॉक
PMJAY योजना अधिक चांगली होईल
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेशी संबंधित सर्वांशी बोलून प्राधिकरण त्यात सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. हेल्थ बेनिफिट पॅकेजच्या दरांमध्ये सुधारणा करणे या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाल्यापासून अधिकाधिक रोगांवरील उपचारांचा सतत समावेश केला जात आहे. यासह, रोगांच्या उपचारासाठी खर्च केलेल्या रकमेशी संबंधित पॅकेजमध्ये वारंवार सुधारणा केली जात आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या आजारांवर उपचार घेण्याची सुविधा मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: