तेजीची हुलकावणी ; नफावसुलीने सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, बाजारात प्रचंड घसरण


हायलाइट्स:

  • आज बुधवारी सेन्सेक्समध्ये ५०० अंकाची घसरण झाली
  • राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७८ अंकांनी कोसळला आहे.
  • गुंतवणूकदारांना २.७८ लाख कोटींचा फटका बसला आहे.

मुंबई : दिवसाची सुरुवात सकारात्मक करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीला दुपारनंतर नफेखोरीला सामोरे जावे लागले. आज बुधवारी सेन्सेक्समध्ये ५०० अंकाची घसरण झाली असून निफ्टी १७८ अंकांनी कोसळला आहे. दोन्ही निर्देशांकात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांना २ लाख ७८ हजार कोटींचा फटका बसला.

‘यूके’मध्ये दिवाळखोर अन् हजारो कोटी दडवले; ‘पॅंडोरा पेपर्स’मुळे अनिल अंबानींचा खरा चेहरा उघड
चौफेर विक्रीने सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २७ शेअरमध्ये घसरण झाली. तर एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि बजाज फायनान्स या शेअरमध्ये किंचित वाढ झाली. आजच्या सत्रात टीसीएस, मारुती, ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, कोटक बँक, एसबीआय, सन फार्मा, एचसीएल टेक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टायटन या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

गृहिणींचं बजेट कोलमडणार; घरगुती गॅस सिलिंडर महागला, मुंबईत एका सिलिंडरसाठी मोजा इतके रुपये
आजच्या सत्रात सेन्सेक्समधील इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज ऑटो या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. आज बीएसई मेटल इंडेक्समध्ये सर्वाधिक २.९८ टक्के घसरण झाली. नफावसुलीचा फटका रियल्टी इंडेक्सला देखील बसला. आज इंडियाबुल्स रियल इस्टेट, ओबेराय रियल्टी, सनटेक रियल्टी, गोरडेज प्रॉपर्टी, शोभा, डीएलएफ या शेअरमध्ये घसरण झाली. बाजारा बंद होताना सेन्सेक्स ५५५ अंकांनी घसरला आणि ५९१८९ अंकांवर स्थिरावला. निफ्टी १७६ अंकांनी घसरला असून तो १७१७६ अंकांवर बंद झाला.

RBI ने बँंक कर्मचाऱ्यांना दिलं खास गिफ्ट ; जाणून घ्या नेमका काय फायदा होणार
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. त्याचे पडसाद आशियातील भांडवली बाजारावर उमटले. जपान, सिंगापूर शांघाई या शेअर बाजारात घसरण झाली. जागतिक पातळीवरील पत मानांकन संस्था मुडीजने भारताचे मानांकन नकारात्मकवरून स्थिर असे केले.

स्टार्टअपचा नवा फंडा; आठवड्यातून फक्त ३ दिवस करा काम अन् मिळेल पूर्ण पगार
आजपासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरु झाली आहे. सध्या देशात लसीकरण मोहीम सुरु असून करोना नियंत्रणात आला आहे. परिणामी रिझर्व्ह बँक व्याजदर तूर्त जैसे थे अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: