आमदार समाधान आवताडे,आमदार प्रशांत परिचारक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी , कक्ष अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश..
पंढरपूर /मंगळवेढा/नागेश आदापूरे - महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगार यांच्या प्रलंबित मागण्यां बाबत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन प्रश्नासंदर्भात मागणी केल्या होत्या.या पत्राची दखल घेत कक्ष अधिकारी महेश दळवी यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे आयुक्त यांना वरील पत्राची दखल घेऊन अवलोकन करून कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
या केल्या होत्या प्रमुख मागण्या..
त्यामध्ये २००५ पासून बंद केलेल्या सफाई कामगारांची पेन्शन पुन्हा सुरू करावी. निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांचे पेन्शन अंशराशीकरण विनाविलंब सुरू करण्यात यावे. सफाई कामगारांच्या नियुक्तीसाठी मापदंड समिती निर्माण करावी. सफाई कामगारांना त्यांच्या व्यवसाया नुसार नव्हे तर शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर वर्ग-३ पदावर नियुक्ती द्यावी. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नियुक्ती मिळालेल्या व काही कारणास्तव बडतर्फ केलेल्या सफाई कामगारांना सेवेत रुजू करून घ्यावे किंवा त्यांचे इतर वारस नेमणूक द्यावी. राज्यातील सफाई कामगारांचा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात यावा. लाड/पागे समिती ची काटेकोर अंमलबजावणी ३० दिवसाच्या आत करण्यात यावी. सर्व महानगर पालिका/मध्ये रिक्त असलेल्या नियमित सफाई कामगार कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावी. शहराची वाढती लोकसंख्या वाढीवर क्षेत्रफळ लक्षात घेता नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका मध्ये १ लाख सफाई कामगारांची पदे मंजूर करण्यात यावीत. नवीन आकृतिबंध मंजूर करावा.नगरपालिका नगरपंचायत महानगर पालिका मधील सफाई कामगारांच्या वेतनावर १००% अनुदान शासनाने मंजूर करावे. वर्ग महानगरपालिका मध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता केडर मधूनच आयुक्तांची नियुक्ती व्हावी. सर्व महानगरपालिका मध्ये रिक्त असलेल्या नियमित सफाई कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावी. सर्व राज्यात नगरपालिका’ महानगरपालिका नगरपंचायत मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर सफाई सेवा ठेका पद्धत बंद करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची काटेकोर अंमलबजावणी होऊन प्रत्येक सफाई कर्मचार्यांची घरे बांधून द्यावीत.अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस रजिस्टर नंबर ७२६२ कामगार संघटना करीता मंत्रालयासमोर मुंबई येथे कार्यालया साठी जागा मिळावी. सफाई कामगारांचे भाग्यविधाता कर्मवीर दादासाहेब वासुदेवराव चांगरे यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे पुनर्घटन करून सफाई कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कामगार पुढाऱ्यांची त्यावर नियुक्ती करावी. सन १९९३ पूर्वीचे कोर्टाच्या आदेशाने नियुक्त झालेल्या सफाई कामगारास लाड /पागे समितीच्या शिफारशीचा लाभ मिळावा. अनुसूचित जाती करता राखीव असलेल्या १३% आरक्षणा मधून स्वतंत्ररीत्या ५% आरक्षण वाल्मीक समाजाकरता वेगळे मिळावे. वंशपरंपरेने डोक्यावर मैला वाहणाऱ्या मेहतर/ वाल्मिकी समाजाच्या वारसदार कडून जाती प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. वारस नोकरी देताना लहान कुटुंबाचे अट स्थितील करण्यात यावी. अर्ज देण्याबाबत एक वर्षाची अट शिथिल करण्यात यावी. सफाई कामगार वरून वर्ग-३ पदोन्नती मिळाल्यास वारसा हक्कांमध्ये बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
या मागण्या यावेळी आमदार आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या.
यावर आता कक्ष अधिकारी महेंद्र दळवी यांनी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांना पत्र देऊन वरील मागण्यांचा आपल्या पातळीवर अवलोकन करून कार्यवाही करावी अशी सूचना करण्यात आली आहे.