railway employees : खूशखबर! रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट; मिळणार ‘इतक्या’ दिवसांचा बोनस


नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाने राजपत्रित अधिकारी वगळून रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या ( railway employees ) पगाराएवढा उत्पादकतेवर आधारित बोनस मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. सुमारे ११.५६ लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आले. रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस मिळतो. यावर्षीही रेल्वेच्या या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला जाईल, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. यात आरपीएफ आणि आरपीएसएफच्या जवानांचा यात समावेश नाही. यामुळे त्यांना हा बोनस मिळणार नाही.

‘पीएम मित्र योजना’ सुरू केली जाईल. ही योजना कापड आणि वस्त्रांच्या क्षेत्रात मोठे योगदान देईल. यामुळे लाखो नागरिकांना रोजगार मिळेल. ५ वर्षात ४४४५ कोटी खर्च केले जातील. ७ मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजनल अँड अॅपरल (MITRA) पार्क त्यावर बांधण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Lakhimpur Violence: मुलावर हत्येचा आरोप, केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

RoSCTL ची योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेला २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्यातीबाबत उत्साह आहे. पीएम मित्र योजनेद्वारे सुमारे ७ लाख नारिकांना प्रत्यक्ष आणि १४ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, ही आमची कल्पना आहे. आतापर्यंत १० राज्यांनी या योजनेत रुची दाखवली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: