वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत बालाजी मलपे मिञ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत बालाजी मलपे मिञ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी Balaji Malpe family’s social commitment to avoid unnecessary birthday expenses

पंढरपूर /प्रतिनिधी – पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांचा वाढदिवस प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी व डिजीटल फटाके यांद्वारे साजरा केला जातो परंतु त्यांचा आठ ऑक्टोबर यावर्षीचा वाढदिवस हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अनावश्यक असा खर्च टाळून साजरा करण्याचे ठरविले होते त्यातच मलपे मिञ परिवारातील प्रशांत काळे यांचे काही दिवसांपुर्वी नुकतेच दु:खद निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत काळे यांच्या लहान मुलांच्या पुढील शिक्षणासाठी काही आर्थिक स्वरूपाची बँकेत एफडीव्दारे मदत करून माजी नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.माजी नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवाराने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: