लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने मंगलसृष्टी वृद्धाश्रमात ब्लँकेट वाटप

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने मंगलसृष्टी वृद्धाश्रमात ब्लँकेट वाटप Distribution of blankets at Mangalsrishti Old Age Home on behalf of Lions Club Solapur Twin City

सोलापूर,06/10/2021 – लायन क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने व श्वेतांबरी मालप,अनिरुद्ध होमकर यांच्या सौजन्याने आज मंगलसृष्टी वृद्धाश्रम, बी सी बॉईज हॉस्टेल, जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे लिओ डिस्ट्रिक्ट चेअरमन अॕड. श्रीनिवास कटकुर यांच्या हस्ते व अध्यक्ष लायन सौ.नंदिनी जाधव, सचिव अभियंता सागर पुकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वयोवृद्ध महिलांना थंडीपासून बचाव होण्याकरता प्रेमाची व मायेची उबदार असे ब्लँकेट वाटप करण्यात आले.लायन क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम सुरू असतात.

  यावेळी सेवा सप्ताह प्रमुख लायन सोमशेखर भोगडे आणि लायन श्वेतांबरी मालप ज्येष्ठ लायन विश्वनाथ स्वामी व अनिरुद्ध होमकर आदी उपस्थित होते . या कार्यक्रमप्रसंगी मंगलसृष्टी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध महिलांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंदाचा, आपुलकीचा अनुभव दिसत होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: