ajay kumar mishra meets amit shah : लखीमपूर प्रकरणामुळे अजय मिश्रांचे मंत्रिपद धोक्यात? सूत्रांनी दिली माहिती


नवी दिल्लीः लखीमपूर खिरी हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी ( ajay kumar mishra meets amit shah ) यांच्या मंत्रिपदावरील धोका टळला आहे. अजय मिश्रा हे मंत्रिपदी कायम राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजय मिश्रा यांची आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अजय मिश्रा यांनी लखीमपूर प्रकरणी स्पष्टीकरण दिले. लखीमपूर खिरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजिय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. यापार्श्वभूमीवर अजय मिश्रा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी लखीमपूर प्रकरणाबाबत गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण माहिती दिली आणि त्यांच्या बाजूने पूर्ण स्पष्टीकरण दिले, असं सूत्रांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा यांनी अजय मिश्रा यांना सध्याच्या संपूर्ण तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. अजय मिश्रा यांनी अमित शहा यांना हिंसाचारात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले. तसंच अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवण्याची विरोधकांची मागणी अनावश्यक मागणी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुलावर हत्येचा आरोप, केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

मिश्रांच्या स्पष्टीकरणावर समाधानी

सरकार आणि पक्षातील एक मोठे नेते अजय मिश्रा टेनी यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी आहेत. पक्षालाही ब्राह्मण चेहऱ्याशी कुठलीही छेडछाड करायची नाहीए. भाजप ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे आणि ते स्वतः ब्राह्मण नेत्याच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसंच या संपूर्ण प्रकरणात अजय मिश्रा टेनी यांची कुठलीही भूमिका नाही, हे विरोधी पक्ष जाणून असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.

लखीमपूर खिरी प्रकरणापूर्वी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे एक वक्तव्य व्हायरल झाले आहे. ज्यात ते शेतकऱ्यांविरोधात नागरिकांना चिथावताना दिसत आहेत. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. पण आता अजय मिश्रा टेनी यांच्या मंत्रिपदावरील गंडांतर टळले असल्याचं दिसतंय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: