‘दहशतवाद्यांनो, हिंमत असेल तर समोर या’, काश्मिरी पंडित तरुणीचे आव्हान
ते माखनलाल बिंद्रू कधीच मरणार नाहीत, तुम्ही फक्त त्यांच्या शरीराचा वध केला आहे आणि मी हिंदू असूनही कुराण देखील वाचले आहे आणि कुराण म्हणते की हा चोला (शरीर) बदलेल, पण त्यांचे विचार तसेच राहतात. माखनलाल बिंद्रू एक आत्मा म्हणून जिवंत असतील. ते काम करत असताना त्यांना ज्याने कोणी गोळ्या घातल्या, जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याने माझ्यासमोर यावं आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावं, असं ती म्हणाली.
ते एक चांगले व्यक्ती होते. त्यांनी काश्मीर आणि काश्मिरीयतची सेवा केली. त्याचे शरीर गेले पण त्याचा आत्मा अजूनही जिवंत आहे. एक दिवस प्रत्येकजण मरणार आहे. आपल्याला अल्लाह, देव आणि गुरु नानक यांना उत्तर द्यावे लागेल. ज्याने हे केलं तो नरकातच जाणार. ही काश्मीरची लढाई नाही. कारण काश्मीरची सेवा करणाऱ्या व्यक्तीची तुम्ही हत्या केली आहे. ही कुठली आली काश्मीरची लढाई?, असा सवाल तिने दहशतवाद्यांना केला आहे.
बिंदू ही काश्मिरी पंडित आहे. १९९० च्या दशकात जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद उफाळल्यानंतर हजारो काश्मिरी पंडितांनी स्थलांतर केले. पण काही काश्मिरी पंडित अजूनही काश्मीरमध्ये आहेत. माखनलाल बिंद्रू हे त्या काश्मिरी पंडितांपैकी एक होते.