मुंबईच्या विजयात रोहित शर्माच्या विक्रमाचा विसर पडला; जाणून घ्या…


दुबई: राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या करो वा मरो सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी केली आणि ८ विकेटनी विजय मिळवला. यामुळे मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. मुंबईने विजयासाठीच्या ९१ धावांचे लक्ष्य फक्त ८.२ षटकात दोन विकेटच्या बदल्यात पार केले. यामुळे मुंबई इंडियन्सचे नेट रनरेट देखील सुधारले आहे. मुंबईकडून ईशान किशनने फक्त २५ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने १३ चेंडूत २२ धावा केल्या. रोहित मोठी खेळी करू शकला नसला तरी त्याने टी-२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय.

वाचा- वाईट बातमी: टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारताला बसला मोठा धक्का; हा खेळाडू झाला जखमी

रोहितने या सामन्यात १ चौकार आणि २ षटकार मारले. रोहितने तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रेयस गोपालला षटकार मारला आणि टी-२० क्रिकेटमध्ये आजवर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम स्वत:च्या नावावर केला. रोहितचा हा टी-२० मधील ४००वा षटकार ठरला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. टी-२०मध्ये सर्वाधिक षटकाराचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १ हजार ४२ षटकार मारले आहेत. षटकारांच्या बाबतीत आता रोहितच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे. त्याने ४३४ षटकार मारले आहेत. त्यानंतर शेन वॉटसनचा क्रमांक लागतो. वॉटसनने ४६७ षटकार मारले आहेत.

वाचा- रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला, ठरवूनच जिंकलो !

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

१) ख्रिस गेल- १ हजार ४२
२) कायरन पोलार्ड- ७५८
३) आंद्रे रसेल- ५१०
४) ब्रॅडन मॅकलम- ४८५
५) शेन वॉटसन- ४६७
६) एबी डिव्हिलियर्स – ४३४
७) रोहित शर्मा- ४००

वाचा- धोनीच्या निवृत्तीवर CSK ने दिलं मोठं अपडेट; वाचा सविस्तर बातमी

रोहित शर्मा (फोटो-आयपीएल)Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: