महाराष्ट्र परिचय केंद्र महाराष्ट्र राज्याची प्रतिमा उंच करीत आहे – माजी मंत्री सुरेश खाडे
महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश खाडे यांची परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली . महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री खाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासह शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ मासिकही भेट म्हणुन देण्यात आले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती अरोरा यांनी परिचय केंद्राच्या तवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.परिचय केंद्राद्वारे प्रकाशित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती आणि दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वय आदिंबाबत माहिती दिली.
श्री.खाडे यांनी परिचय केंद्राच्या कामांचे कौतुक करतानाच परिचय केंद्र महाराष्ट्र राज्याची प्रतिमा उत्तम प्रकारे उंच करीत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. परिचय केंद्राच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना श्री खाडे यांनी शुभेच्छा दिल्या.