हर्षल पटेलने केली कमाल; बुमराहचा विक्रम मोडला आणि झाला नंबर वन


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ५१वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात सुरू आहे. या लढतीत आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज हर्षल पटेलने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षलने भारतीय संघाचा मुख्य गोलंदाजी जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला.

वाचा- मुंबईच्या विजयात रोहित शर्माच्या विक्रमाचा विसर पडला; जाणून घ्या…

हर्षलने आयपीएल २०२१ मध्ये २९ विकेट घेतल्या आहेत. याआधी आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर होता. त्याने गेल्या म्हणजे आयपीएल २०२० मध्ये २७ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या आधी हरभजन सिंगने २०१२ साली २४ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. जयदेव उनाडकटने २०१७ साली हरभजनच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

वाचा- वाईट बातमी: टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारताला बसला मोठा धक्का; हा खेळाडू झाला जखमी

वाचा- Video: २५ चेंडूत विस्फोटक ५० धावा; या खेळाडूंच्या सल्ल्यानंतर ईशानला फॉर्म गवसला

आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याने २०१३ साली ३२ विकेट घेतल्या होत्या. तर कागिसो रबाडाने २०२० मध्ये ३० विकेट घेतल्या होत्या. मुंबईच्या लसित मलिंगाने एका हंगामात २८ विकेट घेतल्या होत्या. मलिंगाने ही कामगिरी २०११ साली गेली होती. आता हर्षलने या सर्वांना मागे टाकले आहे. त्याच्यापुढे रबाडा आणि ब्रावो हे दोन गोलंदाज आहेत. आरसीबी या हंगामात किमान दोन सामने खेळणार आहे. त्यामुळे हर्षलला मोठा विक्रम स्वत:च्या नाववर करण्याची संधी आहे.

हर्षलने या हंगामातील पहिल्या लढतीत मुंबईविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने मुंबईविरुद्ध हॅट्रिक देखील घेतली होती. हैदराबादविरुद्ध हर्षलने ३३ धावा देत ३ विकेट घेतल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: