वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; एक जखमी, शेतीपिकांचे नुकसान
हायलाइट्स:
- नाशिक जिल्ह्यातील देवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी.
- मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान.
- झाड उन्मळून पडण्याच्या एका घटनेत एक व्यक्ती जखमी.
वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठं-मोठे झाडे उन्मळून पडली होती. यामुळे वाहतूकीस रस्ता बंद झाल्याने वाहतूक खोळंबली होती स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करत वाहतूक सुरू केली आहे तसेच अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा- शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; अंबाबाईच्या दर्शनासाठी इथे करा ऑनलाइन बुकिंग
मंगळवारी वीज कोसळून एक तरुण ठार
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे वीज कोसळून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. रामू रामचंद्र चंद्रे (वय ३८) असे या तरुणाचे नाव आहे. रामू हा रानात गुरे चारण्यासाठी गेलेला असताना वीज कोसळली.तसेच आणखी एका दुर्घटनेत दहा शेळ्या ठार झाल्या. या घटनांमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याच प्रमाणे सामुंडी येथे मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसात झाडावर वीज कोसळली. यात जीवितहानी झाली नसली तरी देखील जवळच असलेल्या कुटुंबातील महिलेसह तिच्या तीन मुली व मुलास जबर धक्का बसून हे सर्व जण बेशुद्ध झाले.
क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! आज करोना बाधितांची मृत्यूसंख्या वाढली, नव्या रुग्णांचा आलेखही वर
या बरोबरच अंबई येथील सुनील बाबुराव भुतांबरे यांच्या दहा शेळ्यांचाही अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेचा तलाठ्यांनी पंचनामा केला असून, तहसीलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, सतीश निकम यासह मंडलाधिकारी हेमंत कुलकर्णी, रोकडे यांनी घटनांचा आढावा घेतला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टीवरील कारवाईतील मनीष भानुशाली, के. पी. गोसावी कोण आहेत?