जळगावात तणाव : दुचाकीचा धक्का लागल्याने तरुणाला मारहाण; नंतर तुफान दगडफेक
हायलाइट्स:
- तरुणाला बेदम मारहाण
- नंतर तरुणास सोडवण्यासाठी तुफान दगडफेक
- पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल
दुचाकीचा धक्का लागल्यावरुन या दोन्ही तरुणांमध्ये झटापट सुरू झाली. अनोळखी तरुणाने गोकुळला बेदम मारहाण केली. ही माहिती गोकुळच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन वाद सोडवण्याचे प्रयत्न केले. मात्र , मारहाण करणारा तरुण गोकुळला मारतच होता. अखेर गोकुळला वाचवण्यासाठी जमावाने दगडफेक केली.
मार खाण्याच्या भीतीने तो अनोळखी तरुण घटनास्थळावरुन बेपत्ता झाला, तर गंभीर जखमी असलेल्या गोकुळला नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डोक्याला दुखापत झालेली असल्यामुळे गोकुळ याचे सीटीस्कॅन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, मारहाण करणारा तरुण कोण होता? त्याने गोकुळला मारहाण का केली? याचे कारण देखील त्याच्या कुटुंबियांना माहिती नव्हते. या प्रकरणी पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.