स्त्री आधार केंद्र व केअर फॉर यू या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील महिलांना अन्नधान्य किटचे वाटप
स्त्री आधार केंद्र व केअर फॉर यू या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून बुधवार पेठ, पुणे येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांना अन्नधान्याचे १०० किटचे वाटप… ना.डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे,दि ०३ - कोरोना महामारीमुळे बुधवार पेठ येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची विनंती येथील महिलांनी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. याबाबत उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी महिला व बाल विकास विभाग यांच्याशी संपर्क करून धान्य वाटपाबद्दल चर्चा केली. त्यानंतर बुधवार पेठेतील १०० महिलांकरिता अन्नधान्याची सोय करण्यात आली.आज या अन्नधान्याच्या किटचे वाटप ' केअर फॉर यू' या स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती पायल राठी यांच्यावतीने आणि स्त्री आधार केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे महिलांशी संवाद साधला. सध्या कोरोनाचे संकट वाढत असल्याने दुहेरी मास्क वापरण्याचेही सर्व महिलांना आवाहन केले.तसेच पुढील काळात देखील महिलांना वेळोवेळी मदत केली जाईल असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
महिला व बाल विकास विभागातून देण्यात आलेले अनुदानासाठी स्त्री आधार केंद्राच्या श्रीमती अश्विनी शिंदे यांनी १५०० महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते उघडून या महिलांना शासनाच्या सर्व मदत मिळून देण्यासाठी कार्य करत असतात, असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. सर्व वाटपाचे नियोजन स्त्री आधार केंद्राच्या श्रीमती अश्विनी शिंदे, महाराष्ट्र तरुण मंडळाचे सल्लागार राजेंद्र शिंदे यांनी केले होते.
स्त्री आधार केंद्र व केअर फॉर यू या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील महिलांना अन्नधान्य किटचे वाटप Distribution of food kits to women in Pune through Stree Aadhar Kendra and Care for You