झेडपी, पंचायत समिती निवडणूक निकालांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया


हायलाइट्स:

  • झेडपी, पंचायत समिती निवडणूक निकालांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • महाविकास आघाडी सर्वच जागांवर एकत्र लढली नव्हती – अजित पवार
  • पुढं कसं जायचं यावर आम्ही विचार करतोय – अजित पवार

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना यशाचे दावे केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोटनिवडणुकीच्या निकालामुळं फार आनंदही झाला नाही आणि फार दु:खंही झालं नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar on ZP, Panchayat Samiti Election Results)

वाचा: झेडपी निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान

राज्यातील धार्मिक स्थळे आजपासून खुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. ‘झेडपी आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सगळ्याच ठिकाणी एकत्र लढलेली नव्हती. अनेक ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. तिन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केली तर ही मतं खूप जास्त होतात. पण ‘असं केलं तर तसं आणि तसं केलं तर असं’ ह्याला काही अर्थ नाही,’ असं अजित पवार म्हणाले.

वाचा: करोना संकट कायमचं जाऊ दे; मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना

‘सध्याची राजकीय, सामाजिक व नैसर्गिक परिस्थिती पाहता निवडणुका होऊच नयेत असं अनेकांचं मत होतं. मात्र, निवडणूक आयोगानं तारखा घोषित केल्या. त्यामुळं निवडणूक घ्यावी लागली. सभांना मर्यादा होत्या. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं काम केलं. जनतेनं समाधानकारक निकाल दिलाय असं मला वाटतं. आणखी कुठं आणि कशी दुरुस्ती करावी लागेल यावर आम्ही विचार करत आहोत. कालच्या निकालानंतर मुख्यमंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे असे आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. त्यात सविस्तर चर्चा झाली. पुढं कसं जाता येईल यावर विचारविनिमय झाला,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: