रुपया घसरला! गाठली ६ महिन्यातील सर्वांत निचांकी पातळी, ही आहेत कारणे


हायलाइट्स:

  • अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांनी घसरला.
  • गेल्या सहा महिन्यातील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण
  • सेन्सेक्स बुधवारी ५५५ अंकांनी घसरला.

नवी दिल्ली : आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारी (६ ऑक्टोबर) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांनी घसरला. गेल्या सहा महिन्यातील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होत ७४.९८ प्रति डॉलरवर बंद झाला. डॉलर इतर चलनांच्या तुलनेत अधिक मजबूत झाला आणि गुंतवणूकदारांनी घरगुती शेअरमध्ये प्रचंड विक्रीच्या दृष्टीने सावध पवित्रा घेतला आहे. त्याचा परिणाम रुपयावर झाला आहे.

सोने तेजीत तर चांदी स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ७४.६३ वर उघडला. ट्रेडिंग दरम्यान रुपया ७४.५४ उच्चांकावर आणि ७४.९९ निचांकी पातळीमध्ये राहिले आणि शेवटी ७४.९८ प्रति डॉलरवर बंद झाले. जे मागील दिवसाच्या बंद किंमतीच्या तुलनेत ५४ पैशांनी कमी झाले आहे. २३ एप्रिलनंतर बाजार बंद होण्याची ही सर्वात कमकुवत पातळी आहे. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.४१ टक्क्यांनी वाढून ९४.३६ वर पोहोचला. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.५५ टक्क्यांनी घसरून ८२.११ डॉलर प्रति बॅरलवर आला आहे.

भारतीयांना क्रिप्टोकरन्सीची भुरळ; डिजिटल करन्सी मार्केटची उलाढाल प्रचंड वाढली, हे आहे कारण
डॉलर एका वर्षाच्या उच्चांकावर
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे फॉरेक्स अँड बुलियन अॅनालिस्ट गौरांग सोमय्या म्हणाले की, “देशांतर्गत आणि जागतिक इक्विटीमध्ये कमकुवतपणा आणि डॉलरने एका वर्षातील उच्चांक गाठल्याने रुपयाची तीव्र घसरण झाली. त्यामुळे शुक्रवारी जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या आर्थिक पुनरावलोकनापूर्वी बाजारातील व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

दोन दिवसांच्या तेजीला लागला ब्रेक
दोन दिवसांच्या तेजीनंतर बाजार आज घसरणीसह बंद झाला. जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने सेन्सेक्स बुधवारी ५५५ अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे २,५७,७८५.१७ कोटी रुपये बुडाले. बीएसई ३०-शेअर सेन्सेक्स ५५५.१५ अंकांनी किंवा ०.९३ टक्क्यांनी घसरून ५९,१८९.७३ अंकांवर आला. यामुळे गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्स वाढला होता. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ६६५.०२ अंकांच्या नुकसानीसह ५९,०७९.८६ अंकांवर आला होता.

चर्चा तर होणारच! राकेश झुनझुनवालांनी घेतली पीएम मोदींची भेट, अर्थमंत्र्यांशी केली चर्चा, नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या
जागतिक ट्रेंडचा कमकुवत प्रभाव
यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २,५७,७८५.१७ कोटी रुपयांनी कमी होऊन २,६२,२०,५४७.०५ कोटी झाले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सिद्धार्थ खेमका म्हणाले की, “भारतीय बाजार सकारात्मक ट्रेंडने उघडले, पण नंतर कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे नुकसानासह बंद झाले.”

आरबीआय चलनविषयक धोरणाची बैठक सुरू
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, “कमजोर जागतिक ट्रेंडमुळे धातू आणि आयटी शेअरमध्ये नफा बुकिंग झाली. यामुळे लवकर नफा गमावून बाजार तोट्यात बंद झाला. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक आर्थिक आढावा बैठकही बुधवारपासून सुरू झाली. असे मानले जाते की, केंद्रीय बँक व्याजदर बदलणार नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: