Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये शाळेत घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन शिक्षक ठार


हायलाइट्स:

  • दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सामान्य नागरिक
  • पाच दिवसांत पाच सामान्य नागरिकांची हत्या
  • ‘द रेजिस्टन्स फ्रंट’नं स्वीकारली एका हत्येची जबाबदारी

जम्मू काश्मीर : श्रीनगरच्या ईदगाह भागात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. दहशतवाद्यांकडून श्रीनगरच्या एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन शिक्षक ठार झाल्याचं समजतंय. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचाही समावेश आहे. ईदगाह भागातील संगम शाळेत हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चांद यांची हत्या करण्यात आलीय.

हे दोन्ही शिक्षक संगम शाळेत तैनात होते. ही उच्च माध्यमिक वर्गाची शाळा आहे. दोघेही शिक्षक अल्लोचोईबाग परिसरात राहत होते. शाळेत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी थेट शिक्षकांवर बंदूक रोखून गोळीबार केल्याचं सांगितलं जातंय.

या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. जम्मू काश्मीर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

सामान्य नागरिक निशाण्यावर

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांतून दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर घेतल्याचं समोर येतंय. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्याची ही पाचवी घटना आहे. यामध्ये एकून सात नागरिक ठार झाले आहेत.

Road Accident: डबलडेकर बस आणि वाळूनं भरलेल्या ट्रकची जोरदार धडक, १४ जागीच ठार
‘दहशतवाद्यांनो, हिंमत असेल तर समोर या’, काश्मिरी पंडित तरुणीचे आव्हान

पाच दिवसांत सात हत्या

या अगोदर बुधवारी अवघ्या दोन तासांत दहशतवाद्यांकडून तीन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. श्रीनगरच्या इक्बाल पार्क परिसरात बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बिंदरू यांच्या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) नं स्वीकारली होती. १९९० च्या दशकात जम्मू काश्मीरमध्ये फैलावलेल्या दशतवादानंतरही काश्मीर पंडित समुदायाशी निगडीत बिंदरू यांनी आपल्या पत्नीसोबत इथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. इथेच ते आपलं मेडिकल चालवत होते.

बिंदरू यांच्या हत्येनंतर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या एका सामान्य व्यक्तीलाही गोळ्या घालून ठार केलं. ही व्यक्ती मूळची बिहारच्या भागलपूरची रहिवारी वीरेंद्र पासवान असल्याचं समजतंय.

तसंच अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. SUMO अध्यक्ष नायदखाई मोहम्मद शफी उर्फ सोनू यांना दहशतवाद्यांनी आपल्या निशाण्यावर घेतलं.

Navratri 2021: पंतप्रधान मोदी नवरात्रौत्सवात सहभागी, उत्तम आरोग्य-समृद्धीसाठी केली प्रार्थना
Jim Corbett National Park: ‘जिम कॉर्बेट’ उद्यानाचं नामांतर? जितेंद्र आव्हाडांचा भाजप सरकारवर निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: