मिळेल आयकरात सूट; आरोग्य विमा खरेदी करा आणि मिळवा दुहेरी फायदा


हायलाइट्स:

  • आरोग्य विमा केवळ तुमच्या जीवनाचे रक्षण करत नाही, तर हा कर वाचवण्याचा एक उत्तम पर्याय देखील आहे.
  • मेडिकल इंशोरन्समुळे कोणते फायदे मिळतात त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ .
  • प्रीमियम भरल्यावर आयकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत सूट मिळण्याचा लाभ मिळतो.

पुणे / मुंबई : करोनामुळे आरोग्य विम्याचे महत्त्व खूप पटीने वाढले आहे. या महामारीनंतर आरोग्य विमा बाजारात मोठी तेजी आली आहे. आरोग्य विमा केवळ तुमच्या जीवनाचे रक्षण करत नाही, तर हा कर वाचवण्याचा एक उत्तम पर्याय देखील आहे. अशा प्रकारे तुम्हाला दोन फायदे मिळतात. वैद्यकीय विमा (मेडिकल इंशोरन्स) घेतल्याने तुम्हाला करामध्ये कोणते फायदे मिळतात त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

दरवाढीचा भडका ; १२ दिवसांत डिझेल ३.१५ रुपयांनी महागले, पेट्रोलमध्ये झाली इतकी वाढ
जर तुम्ही आरोग्य विमा खरेदी केला, तर तुम्हाला प्रीमियम भरल्यावर आयकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत सूट मिळण्याचा लाभ मिळतो. सूट म्हणजे तुमच्या निव्वळ करपात्र उत्पन्नात ही रक्कम कमी होते. कलम ८० डी अंतर्गत २५ हजार ते ७५ हजारांपर्यंत सूट मिळू शकते. जर तुम्ही व्यक्ती आणि जोडीदाराची पॉलिसी घेतली असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त २५ हजारांपर्यंत सूट मिळेल. जर पालकांना वैद्यकीय विम्यामध्ये समाविष्ट केले गेले असेल आणि त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तर ५० हजारांपर्यंत सूट मिळेल. जर पालकांचे वय ६० पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ७५ हजारांपर्यंत सूट मिळते.

चर्चा तर होणारच! राकेश झुनझुनवालांनी घेतली पीएम मोदींची भेट, अर्थमंत्र्यांशी केली चर्चा, नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या
पाच हजार रुपयांपर्यंत मिळवा लाभ
या व्यतिरिक्त, प्रतिबंधात्मक वैद्यकीय तपासणी (प्रीवेंटिव्ह मेडिकल चेकअप) अंतर्गत तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ५००० रुपयांपर्यंत कपातीचा लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त, जर कोणी बहु-वर्षीय (मल्टी ईयर) आरोग्य पॉलिसी खरेदी केली, तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळतील. पहिला फायदा म्हणजे तुमच्या प्रीमियमची रक्कम कमी होते. दुसरा फायदा टॅक्सवर आधारित आहे. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने एक लाख रुपये ५ वर्षांसाठी प्रीमियम जमा केले. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला दरवर्षी २० हजार रुपयांचे कर क्रेडिट मिळेल.

मुलीचं भविष्य करा सुरक्षित अन् व्हा निश्चिंत ; कन्यादानावेळी मिळतील २७ लाख, जाणून घ्या काय आहे योजना
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एखाद्या व्यक्तीकडे कॅशलेस हेल्थ कव्हर असेल, तर त्याला वैद्यकीय खर्चाचा काही भाग त्याच्या खिशातून जमा करावा लागतो. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, इन्शुरन्स देखोचे सह-संस्थापक अंकित अग्रवाल म्हणाले की, आरोग्य योजनेमध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय बिलांचा समावेश आहे. तथापि, काही खर्च असे आहेत, जे पॉलिसी अंतर्गत येत नाहीत. कधीकधी असे देखील होते की, काही अनावश्यक चाचण्या विमा कंपनीने वैद्यकीय बिलामध्ये पाहिल्या आहेत. अशा चाचण्या आजारासाठी योग्य वाटत नाहीत, त्यामुळे क्लेमचा लाभ मिळू शकत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: