गावठी टोला – गोफणगुंडा
गावठी टोला:
ते प्रदीर्घ काळ होते मंत्री
आता वयेपरत्वे आहेत घरी
पण बोलताना चालताना पाहताना
सवयींमुळे हाती असते फक्त कात्री “!!
स्वप्ने …..
साखर झोपेत पहाट विरुनी गेली
रंगवलेली स्वप्ने भंगून गेली!१!
स्वप्नात मीच युगपुरुष झालो होतो
प्रत्यक्षात मीच लुटलो जात होतो !!२!!
सर्वत्र गुन्हेगार सत्तेत येथे
कोण चारित्र्यसंपन्न येथे !!3!!
सर्वत्र नीतीचा पंचनामा येथे
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार येथे !!४!
निवडणूक संविधान नाममात्र येथे
जिंकण्यासाठी वाट्टेल ते व्यवहार येथे !!५!!
आनंद कोठडीया ,जेऊर ,९४०४६९२२००
