IND vs PAK भारत-पाकिस्तान टी-२० वर्ल्डकप सामन्यासाठी ICCने घेतला मोठा निर्णय


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी अंपायरांच्या पॅनलची घोषणा केली आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी आयसीसीने १६ मुख्य अंपायर आणि ४ अनुभवी मॅच रेफरी (सामनाधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमान येथे वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. ४५ सामन्यांच्या या स्पर्धेत मैदानावरील १६ अंपायर आणि चार मॅच रेफरी असतील.

वाचा- मी राजीनामा देतोय, टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघासोबत असणार नाही

सहाव्या टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीने अलीम डार, मरॅस इरास्मस आणि रॉड टकर यांची निवड केली आहे. या शिवाय मॅच रेफरीमध्ये भारताचा जवागल श्रीनाथ देखील आहे. अंपायर्समध्ये भारताचे नितिन मेनन यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीची लढत ओमान मध्ये न्यू जोसेन्डर आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. या लढतीसाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ख्रिस गॅफनी हे अंपायर असतील.

वाचा- मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठीचे ठरले नवे समीकरण

या स्पर्धेतील सर्वात हायव्होटेज लढत २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी अंपायर म्हणून दक्षिण आफ्रिकेचे मरॅम इरास्मस आणि न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी हे असतील. तर मॅच रेफरी म्हणून डेव्हिड बून यांची निवड करण्यात आली आहे.

वाचा- हर्षल पटेलने केली कमाल; बुमराहचा विक्रम मोडला आणि झाला नंबर वन

टी-२० वर्ल्डकपसाठीचे मॅच रेफरी
डेव्हिड बुन, जेफ क्रो, रंजन मदुगले, जवागल श्रीनाथ

अंपायर-
ख्रिस ब्राऊन, अलीम डार, कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, नितिन मेनन, अहसन रजा, पॉल रिफेल, लॅग्टन रुसेरे, रॉड टकर, जोएल विल्सन, पॉल विल्सनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: