जोखीम कमी फायदा जास्त; ‘या’ सरकारी योजनेतील गुंतवणुकीने होईल दुप्पट फायदा


हायलाइट्स:

  • किसान विकास पत्र योजना किमान १००० रुपयांसाठी घेतली जाऊ शकते.
  • किसान विकास पत्र योजनेत नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे, जी निश्चित वेळेत तुम्ही गुंतवलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे करण्याची हमी देते.

नवी दिल्ली : प्रत्येकाला वाटतं की, बचतीवर चांगला परतावा मिळावा आणि पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहावे. या बाबतीत पोस्ट ऑफिसची बचत योजना अपेक्षांना खरी उतरते. पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेल्या रकमेवर हमी (सॉवरेन गॅरंटी) मिळते, त्यामुळे कोणत्याही मर्यादेपर्यंत पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे, जी निश्चित वेळेत तुम्ही गुंतवलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे करण्याची हमी देते. ही योजना आहे किसान विकास पत्र.

मुलीचं भविष्य करा सुरक्षित अन् व्हा निश्चिंत ; कन्यादानावेळी मिळतील २७ लाख, जाणून घ्या काय आहे योजना
काय आहे केव्हीपी योजना?
किसान विकास पत्र योजना किमान १००० रुपयांसाठी घेतली जाऊ शकते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. किसान विकास पत्र (केव्हीपी) जारी केल्याच्या अडीच वर्षानंतर कॅश केले जाऊ शकते. केव्हीपी एकेरी किंवा संयुक्तपणे, १० वर्षापेक्षा कमी वयाच्या आणि मतिमंद व्यक्तीच्या नावानेही घेतले जाऊ शकते. ही योजना कोणत्याही विभागीय टपाल कार्यालयातून खरेदी करता येते.

Breaking अजित पवारांना दणका; निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र
आता काय आहे व्याज दर?
किसान विकास पत्र लहान बचत योजनेअंतर्गत (स्मॉल सेव्हिंग्स स्कीम) येत असल्याने त्याचा व्याज दर प्रत्येक तिमाहीत निश्चित केला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये ६.९ टक्के वार्षिक दराने व्याज मिळत आहे. हा व्याज दर १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आला आहे. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे १२४ महिन्यांच्या कालावधीत (१० वर्षे आणि ४ महिने) दुप्पट होतील.

मिळेल आयकरात सूट; आरोग्य विमा खरेदी करा आणि मिळवा दुहेरी फायदा
या सुविधादेखील उपलब्ध
किसान विकास पत्र योजनेत नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, प्रमाणपत्र एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आणि एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्टऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडली जाऊ शकतात. किसान विकास पत्र मॅच्युरिटीपूर्वी कधीही बंद करता येते, पण यासाठी काही अटी लागू आहेत.

अटी पुढीलप्रमाणे आहेत –
१. खातेदाराचा मृत्यू झाल्यास, संयुक्त खात्याच्या बाबतीतही कोणत्याही किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाल्यास.
२. गहाण ठेवण्याच्या बाबतीत गॅझेट अधिकाऱ्याकडून जप्ती करण्यावर
३. न्यायालयाच्या आदेशानंतर
४. ठेवीच्या तारखेपासून २ वर्षे आणि ६ महिन्यांनंतर.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: