

रंगून: म्यानमारच्या सैन्यावर बंडखोरांनी भीषण हल्ला केला. बंडखोरांनी रचलेल्या सापळ्यात अडकलेल्या
म्यानमार लष्कराचे ४० जवान ठार झाले. तर, ३० जण जखमी झाले आहेत. नागरिक प्रतिरोध दलाच्या योद्ध्यांनी हा सापळा रचला होता. हा हल्ला मंगळवारी, मगवे भागातील गंगाव भागात झाला.
हल्ला करणाऱ्या बंडखोरांच्या याव डिफेन्स फोर्सने (वायडीएफ) म्यानमारमधील ‘इरावडी’ वृत्तपत्राला सांगितले की, त्यांनी १४ भुसुरूंगाच्या मदतीने लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळेस लष्कराचा ताफा गंगाव-पाले महामार्गावरून जात होता. या हल्ल्यात ४० जवान ठार झाले. तर, ३० जण जखमी झालेत. या हल्ल्यात एका चिलखती लष्करी वाहनाचेही नुकसान झाले आहे.
बंडखोरांच्या हल्ल्यात ४० जवान ठार झाल्याच्या दाव्याला इरावडी या वृत्तपत्राने अद्याप दुजोरा दिला नाही.
बंडखोरांनी नागरिकांना गंगाव-काले आणि गंगाव-हटिलिन महामार्गापासून सामान्य नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या भागात लष्करासोबत चकमक होण्याची शक्यता आहे.
म्यानमारच्या लष्कराने सरकार उलथवून सत्ता हाती घेतल्यानंतर लोकशाहीवादी नागरिकांची आंदोलने सुरू आहेत. तर, दुसरीकडे म्यानमारमधील काही भागांमध्ये बंडखोर आणि लष्करामध्ये चकमकी सुरू आहेत.
Source link
Like this:
Like Loading...