भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नारायण राणेंना स्थान नाही; तर्कवितर्कांना उधाण


हायलाइट्स:

  • भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
  • महाराष्ट्रातून १५ जणांना स्थान, चार नवे चेहरे
  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना डावलले!

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी (BJP National Executive Committee) जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांसह डॉ. विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र, कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद असून व ज्येष्ठ नेते असूनही नारायण राणे (Narayan Rane) यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.

नड्डा यांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून तब्बल १५ जणांना संधी मिळाली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी, संजू वर्मा, हिना गावित, जमाल सिद्धिकी यांचा समावेश आहे. आधीच्या कार्यकारिणीत असलेले विनोद तावडे, पंकजा मुंडे व सुनील देवधर यांना कायम ठेवण्यात आलं आहे. मुनगंटीवार, शेलार व नागवाणी हे विशेष निमंत्रित आहेत. तर, संजू वर्मा व हिना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जमाल सिद्धिकी यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचा: ‘भाजपला ‘ते’ सहन झालं नसावं म्हणूनच अजित पवारांच्या कंपन्यांवर छापे’

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले, आधी खासदारकी व नंतर केंद्रीय मंत्रिपद मिळवलेले नारायण राणे यांना मात्र कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. अनुभव नेते असलेल्या राणे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं होऊ शकलेलं नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांची कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. असं असताना माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंना डावललं गेल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. राणेंच्या बाबतीत भाजप नेतृत्वानं ‘वेट अँड वॉच’चं धोरण स्वीकारलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचा: शरद पवारांच्या गावातही पोहोचले ईडीचे पथक; काटेवाडीत एकाची चौकशी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: