सोने-चांदीमध्ये महागले ; जाणून घ्या आजचा सराफाचा भाव


हायलाइट्स:

  • आज सोन्याचा भाव ११० रुपयांनी तर चांदी ५०० रुपयांनी महागली आहे.
  • शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरु झाला
  • सराफा व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई : शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरु झाला असून पहिल्याच दिवशी सोने चांदीमध्ये तेजी दिसून आली. आज सोन्याचा भाव ११० रुपयांनी तर चांदी ५०० रुपयांनी महागली आहे. लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहक नवरात्रीमध्ये सराफा बाजारात येत असल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मिळेल आयकरात सूट; आरोग्य विमा खरेदी करा आणि मिळवा दुहेरी फायदा
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६८८१ रुपये आहे. त्यात २६ रुपयांची किंचित घसरण झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६९९० रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१५०७ रुपये आहे. त्यात ५०६ रुपयांची वाढ झाली आहे.

आज सकाळी चांदीने ६१००० रुपयांपर्यंत मजल मारली होती. कमॉडिटी बाजारात या आधी सोमवारी तसेच शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोमवारी सोने ४६६८२ रुपयांवर बंद झाले होते. चांदीचा भाव ६०९०५ रुपये होता. गेल्या आठवडाभरात सोने ८५० रुपयांनी तर चांदी १३०० रुपयांनी महाग झाली.

जोखीम कमी फायदा जास्त; ‘या’ सरकारी योजनेतील गुंतवणुकीने होईल दुप्पट फायदा
Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९०० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४६९०० रुपये इतका वाढला. त्यात २२० रुपयाची वाढ झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०१३० रुपये झाला आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४११० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८१२० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९००० रुपये आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत ३०० रुपयांची वाढ झाली.

Breaking अजित पवारांना दणका; निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र
बुधवारी स्पॉट गोल्ड ०.१४ टक्क्यांनी वाढून १७६२.५० डॉलर प्रति औंसवर बंद झाला. अमेरिकेच्या खासगी वेतनाच्या डाटा अपेक्षेपेक्षा चांगल्या आकडेवारीनंतर डॉलर उंचावला, परिणामी सोन्याच्या किंमतींवर दबाव आला. आठवड्यात अमेरिकेच्या नियोजित रोजगाराच्या प्रमुख आकडेवारीपूर्वी डॉलरने अधिकची वाढ नोंदविली. बाजारातील कमी उत्साह आणि वाढलेल्या व्याजदराच्या प्रमाणात अमेरिकन कोषागारातील उत्पन्नात आवक वाढली. परिणामी,व्याजरहित सोन्यावर आणखी दबाव वाढला असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

मुलीचं भविष्य करा सुरक्षित अन् व्हा निश्चिंत ; कन्यादानावेळी मिळतील २७ लाख, जाणून घ्या काय आहे योजना
आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या अमेरिकेच्या बिगर शेती उत्पन्नावर बाजारांची बारीक नजर असेल. अमेरिकेच्या कोणत्याही सकारात्मक आर्थिक डेटा निश्चितीमुळे अमेरिकन फेडद्वारे कडक आर्थिक धोरणावर पैज वाढून सोन्यावर भार वाढेल. तसेच, जागतिक आर्थिक कार्यक्रम पुन्हा सुरू झाल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे बाजारपेठेतील जोखीम वाढली आहे, परिणामी सुरक्षित समजल्या जाणा-या सोन्यावर दबाव वाढला. परंतु, महागाईची चिंता, तेलाच्या किंमती कमी करणे आणि अमेरिका आणि चीन मधील तणाव बघता, या पिवळ्या धातुला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: