priyanka gandhi : प्रियांका गांधी आक्रमक; म्हणाल्या, ‘PM मोदींना अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावीच लागेल’


लखनऊः लखीमपूर खिरी हिंसाचारावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा सतत ( priyanka gandhi targets pm modi ) केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. लखीमपूर खिरीला रविवारी ३ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रियांका गांधी वाड्रा ठाम आहेत. पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी प्रियांका गांधी बहराइच दौऱ्यावर होत्या. केंद्र सरकारला या प्रकरणी कारवाई करावी लागेल. ही पंतप्रधानांची नैतिक जबाबदारी आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी बुधवारी लखनऊला आले. पण लखीमपूर खिरी घटनेवर ते एक शब्दही बोलले नाहीत. अजय मिश्रा हे त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्यासोबत ते बसतात. जे काही निर्णय होतात, ते त्यांच्यासोबत घेतले जातात. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी जबाबदारी घेऊन अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. शेतकऱ्यांना चिरडून मारलं गेलं, याची पंतप्रधान मोदींना पर्वा नाही. आणि त्यांच्या मंत्र्याच्याच मुलाने हे कृत्य केलं आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

आम्ही प्रत्यक्षदर्शींशी बोललो. त्या सर्वांनी मंत्र्यांच्या मुलाला पाहिले आहे आणि त्याला ओळखतात. मग पंतप्रधान काय करताहेत? जनतेला काय संदेश दिला जातोय? तुम्हाला कुणीही चिरडलं आणि मारलं पण तो आपल्या पक्षाचा असेल तर त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही? देशात असाच मेसेज जातोय, असं म्हणत प्रियांकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

navjot singh sidhu : सिद्धूंच्या १ हजार वाहनांच्या ताफ्याला यूपी पोलिसांनी लावला ब्रेक! सहारनपूरमध्ये घेतले ताब्यात

‘सत्य दडपण्याचा प्रयत्न होतोय’

मीडिया सत्य दाखवत आहे. पण प्रशासन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जगात कोणत्याही देशात अशी घटना घडली आणि केंद्रीय मंत्र्याचा मुलगा त्यात आरोपी असूनही मंत्री राजीनामा देत नाही, असं होणार नाही. मला असा देश दाखवा. पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर निष्पक्ष तपास झाला पाहिजे. आपला मुलगा घटनेस्थली नव्हता, असा दावा मंत्री करत आहेत. तरीही निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते निर्दोष असतील तर नंतरही मंत्री होतील.

Lakhimpur Violence: अटक नाही, हत्या प्रकरणातील आरोपी ‘मंत्रीपुत्रा’ला पोलिसांनी धाडले समन्स

Lakhimpur Violence: आरोपी कोण? कुणाला अटक? सर्वोच्च न्यायालयानं यूपी सरकारला विचारला प्रश्नSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: