पत्रकारांची सुरक्षा आमची जबाबदारी – अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव
अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने सन्मान
सोलापूर / प्रतिनिधी – ज्यांच्या नावात अन कामात आगळी वेगळी हिंमत सर्वसामान्य माणसाचा आधार तर गुन्हेंगारांचे कर्दनकाळ असणारे कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकारांची सुरक्षा आमची जबाबदारी – अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव
पत्रकारांच्या बाबतीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी पत्रकारांची सुरक्षा आमची जबाबदारी असून पत्रकारांनी काळजी करू नये असं ठोस आश्वासन पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकार्यांना दिलं आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,सोलापूर शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी,अक्षय बबलाद, सिद्धार्थ भडकुंबे,डी डी पांढरे,राम हुंडारे , नागनाथ गणपा ,सूर्यकांत व्हनकडे,सतीश गडकरी,राजमल शिवरात्री आदी पत्रकार उपस्थित होते.