lakhimpur kheri incident : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर शरद पवार पुन्हा बोलले…


नवी दिल्लीः नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेला आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांनी महाराष्ट्रातील राजकारण तापलं. हे छापे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर टाकण्यात आले. आता यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यातून शरद पवार यांनी पुन्हा केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे.

अजित पवारांशी संबंधि कंपन्यांवर छापे टाकल्याचं समजलं, असं शरद पवार म्हणाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमधील हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने ही कारवाई झाल्याचं दिसंतय, असं शरद पवार म्हणाले. लखीमपूर खिरीतील हिंसाचाराच्या घटनेची तुलना आपण जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचाच राग सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आलाय. त्यातून ही कारवाई केली गेल्याचं दिसंतय, असं म्हणत शरद पवारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

शेतकरी शांततेत आंदोलन करत असताना सत्ताधारी पक्षातील संबंधितांकडून त्यांना चिरडलं जातं. या घटनेत काही शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अशी घटना पूर्वी कधी घडली नव्हती. या घटनेचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निषेध केला आणि आपणही तीव्र प्रतिक्रिया दिली. लखमीपूर खिरी हिंसाचाराची तुलना जालियानवाला बाग हत्याकांशी केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी रागातून ही करावाई केल्याचं दिसंतय, असं शरद पवार म्हणाले.

‘माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापे का?’

आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आपल्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळी भरला जातो. त्यामुळं हे छापे राजकीय हेतूनं टाकले की इन्कम टॅक्सला खरोखरच काही तपास करायचा होता हे माहीत नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकल्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण ज्या बहिणींची ३५-४० वर्षापूर्वी लग्नं झाली. त्यांचे संसार चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत, त्या माझ्या तीन बहिणींशी संबंधित कंपन्या आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. कोल्हापूर आणि पुण्यात हे छापे टाकण्यात आले आहेत. त्याचं कारण मला माहिती नाही. पण मला त्याचं दु:ख आहे. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेनं याचा जरूर विचार करावा, असं अजित पवार म्हणाले.

लखीमपूर घटनेवर काय म्हणाले होते शरद पवार?

लखीमपूर खेरी इथं शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत होते. सरकारकडं आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा हक्क बजावत होते. त्यांच्यावर सत्ताधारी भाजपशी संबंधित लोकांनी गाडी घालून त्यांना चिरडले. हा सरळसरळ शेतकऱ्यांवरचा हल्ला आहे. उत्तर प्रदेश व केंद्र सरकारनं याची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, असं म्हणत शरद पवारांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेशातील संपूर्ण घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली होती. तसंच उत्तर प्रदेशातील परिस्थितीची तुलना ‘जालियनवाला बाग हत्याकांडा’शी करतानाच पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या मौनाबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं होतं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: